पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४२ )

कारी बनला. पूर्वी रामदेवरावाने, अल्लाउद्दीन बरोबर तह केल्या वेळीं, बादशाहास - नेहमी विविक्षित खंडणी पाठवीत जाण्याचे कबूल केलें होतें; परंतु ती कबूली म्हणजे निव्वळ सक्तीची खुषी असल्यानें त्यानें ती खंडणी पाठविणे पुढें बंद केलें ; • तेव्हा, अल्लाउद्दी हा गादीवर आल्यावर त्यानें रामदेवाचे परिपत्य करण्याकरिता आपला विश्वासू व प्रेमी सरदार मलिक काफूर यांस दक्षिणेत पाठविले; त्या प्रभाणे तो थेट देवगिरीवर चालून आला, आणि उभयतां मध्ये एक मोठे निकराचे युद्ध होऊन ( इ सन १३०७ ) त्यांत रामदेवरावाचा पूर्ण पराजय झाला व तो पाडाव होऊन मलिक काफूरच्या हातीं सांपडला. मलिक काफूर यानें - त्यास दिल्लीस बादशाकडे पाठविले, व त्या ठिकाणी त्यास अजमास सहा महिने प्रतिबंधांत रहावे लागले. त्या नंतर त्याने "आपण बादशाही सत्तेच्या पूर्णपणे आधीन राहूं च कराराप्रमाणे नियमीत खंडणी पाठवित जाऊं " असा बादशाहाशीं ठराव केला. तेव्हां अल्लाउद्दीन याने त्याची सुटका केली व त्याचा सन्मान करून, व त्यास एक छत्र, राजाधिराज हा किताब, व एक लाख रुपये बक्षीस 'देऊन, त्याची दक्षिणत रवानगी केली; या वेळे पासून आपल्या मृत्यू पर्यंत रामदेवरावाने दिल्लीपतीशीं केव्हां ही वैर संपादन केले नाहीं, आणि ठरावा प्रमाणे तो दिल्ली येथे नियमीतपणे खंडणी पाठवीत राहिला.
 रामदेवराव हा इ. सन १३०९ मध्ये मृत्यू पावला. व त्याचा मुलगा शंकरदेव हा गादीवर आला. रामदेवरावाच्या एकंदर आयुष्य क्रमावरून पाहता तो शांतता प्रीय, दयाळू, पापभीरू, व धर्मनिष्ट, असा राज्यकर्ता होता, असें दिसतें. त्यास युद्धाची फारशी गोडी नव्हती, आणि त्याचा मुलगा शंकरदेव याच्या मानानें तो पुष्कळच कमी शूर व धाडशी होता, असे निदर्शनास येतें. कारण तो अशा प्रवृत्तीचा नसता, तर थोड्याशा प्रतिकारा नंतर लागलीच तो अलाउद्दीन तह करण्यास प्रवृत्त झाला नसता; उलट पक्ष शंकरदेव हा शूर व धाडशी नसता तर रामदेवरावानें, अल्लाउद्दीन बरोबर तह केल्या नंतर, तो त्या सहास कोणत्याही प्रकारें विरोध दाखविल्या शिवाय ताबडतोब मान्य झाला असता; परंतु स्वतःतील शौर्य, धमक, व धाडस, या गुणांमुळे आपण भल्लाउद्दीन ज्यास पराभुत करू, अशी त्यास आशा, व खात्री होती; व त्याप्रमाणे तो विजयी ही माला अता; परंतु अकल्पित योगायोगा मुळेच अलाउद्दीन यांस विजय प्राप्त