पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४३ )

होऊन शंकरदेवास माघार घेणे भाग पडलें. युद्धभूमीवर विजय प्राप्ती होण्याचा पूर्ण रंग आला असूनही एखाद्या अगदी क्षुल्लक अथवा साधारण दिसणाऱ्या गोष्टी मुळे कसें चमत्कारिक स्थित्यंतर घडून येतें, याचें, “शंकरदेव व अल्लाउद्दीन यांच्या मधील युद्ध, " हें एक विशेष महत्वाचे असे उदाहरण आहे. या युद्धांमुळे मुसलमानी सत्तेचा दक्षिण देशांत शिरकाव झाला; व याच युद्धांतील विजयामुळे दक्षिण देशावर मुसलमान राज्यकर्त्यांच्या लागोपाठ स्वाऱ्या होऊ लागून भले- -रीस दक्षिणदेश मुसलमानी अमला खालों गेला. बादशहा जलालुद्दीन यांच्या कारकीर्दीतील अलाउद्दीन याची दक्षिणेवरील पहिली स्वारी, ही, ह्या दृष्टीनें अती- शय महत्वाची आहे; हीच स्वारी महराष्ट्रांतील वैभवसंपन्न यादव राजघराण्यास दिल्लीपतीचे अंकित करण्यास कारणीभूत झाली आहे, आणि त्या नंतरच्या अशाच खान्यांमुळे दक्षिणतील यादव राज्य नामशेष होऊन व पुढें विजया नगरच्या संपत्तीमान, व समृद्ध राज्याचीही तीच स्थिती होऊन महाराष्ट्र, कर्नाटक, वगैरे सर्व प्रदेश मुसलमानी अमला खालीं गेलेला आहे.
 रामदेवरावाच्या मृत्यूनंतर शंकरदेव हा इ० सन. १३०९ मध्ये गादी वर आल्यावर त्याने दिल्लीपतीस ठरलेली खंडणी पाठविण्याचे बंद केले; तेव्हां भल्लाउद्दीन यांस त्याबद्दल राग येऊन त्यानें मलिक काफूर यांस इ० सन १३१२ मध्ये पुन्हा देवगिरीवर पाठविले; तेव्हां त्याने शंकरदेवाचा पूर्ण पराजय करून त्यास ठार मारिलें; त्याचे राज्य उध्वस्थ करून देवगिरी शहर आपल्या ताब्यात घेतले, व शेवटीं हैं राज्य मुसलमानी राज्यांत सामील करून-वं महाराष्ट देशावर मुसलमानी सत्तेचा पुर्ण अंमल बसवून, तो दिल्ली येथे परत गेला.
 बादशहा अल्लाउद्दीन यांस आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस विशेष. दुःखांत व मानसिक विवचनेत घालवावे लागले. त्याच्या सरदारांनी त्याच्या विरुद्ध कारस्थानें व पं.द केतुरी करण्यास सुरवात केली; गुजराथेत त्याच्या सत्ते, विरुद्ध मोठं बंड उभारलें गे हैं; चितोडगड सारखे महत्वाचे ठाणे त्याच्या अमला: खालून नाहींसे झाडे, आणि इकडे दक्षिगंत ही संधी साधून शंकर देवाचा मेव्हणा हरपाळदेव यानें मुसलमानी सत्ते विरुद्ध एक मोठे बंड उभारिलें, व देवगिरी- येथील मुसलमान किल्लेदारास तेथून हाकलून देऊन तो तेथे स्वतंत्रपणे राज्य करू लागला. या सर्व गोष्टींचा अल्लाउद्दीनच्या मनावर भयंकर परिणाम होऊन