पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७२ )

ब्याची त्याने फारशी क्षिति बाळगली नाहीं, आणि युद्धकाल नजदीक ओढून आणण्यात त्याने जी चूक केली, तशीच चूक तो नजदीक आल्या वरही केली; आणि त्यानंतर युद्ध सुरू झाल्यावर पालखींतून उतरून युद्धभूमींत जमीनीवर राहण्यांत तर त्याने पहिल्या दोहोंहूनही अधिक भयंकर अशी घोडचूक केलीं. युद्धांत सेनापतीने आपल्या सर्व सैन्यास आपण दिसूं शकूं, अशाच स्थितीत नेहमीं राहिले पाहिजे, युद्धांतील जय-अपजय हा बहुतांशीं सेनानायकाच्या कर्तृत्वावर व युद्धकलाविशारदतेवर अवलंबून असतो; सैन्य किर्तीही कसलेले असले तरी नालायक सेनानायकाच्या धुरिणत्वाखाली ते परि- णामावह कामगिरी बजावू शकत नाहीं; उलटपक्षी फारसे तरबेज नसलेले अथवा कच्चे असलेले सेन्य कसलेल्या सेनानायकाच्या प्रमुखत्वाखाली असेल तर स्वतःच्या करामतीवर तो अशा सैन्याकडूनही पुष्कळच महत्वांची कामगिरी बजावून घेतो; नेपोलियन जवळ नेहमींन प्रत्येक युद्धांत उत्तम कसलेल सैन्य होतें, असें नाहीं; पण तो स्वतःच अलौकिक सेनापती असल्यामुळे आपल्या अगाध बुद्धिसामर्थ्याच्या व युद्धपटुत्वाच्या युक्तयाप्रयुक्तयांच्या जोरावर साधारण सैन्याकडूनही मोठी चमत्कारीक व मननीय कामगिरी बजावून घेऊन कित्येक प्रसंगीं तर युद्धाची सर्व परिस्थितिही साफ बदलून टाकीत असे. नेपोलियन इतका रामराय हा अलौकिक बुद्धिचा नव्हता, ही गोष्ट खरी आहे; पण सारासार विचार करण्या इतपत तो शहाणा व अनुभवी होता, हॅही निःसंशय तितकेच खरें आहे. सतः पाय उतार न होता, पालखीत बसूनच आपल्या सैन्यास त्याला उत्तेजन देतां आले असतें; पाय उदार झालंच पाहिजे, अशा प्रकारची कोणतीही आवश्यक परिस्थिति त्यावेळी उतन्न झाली नव्हती, आणि तो पायउतार होण्या बरोबर जी एक विशिष्ट धोक्याची स्थिति उसन्न झालो, तीही खात्रीनेंच उसन्न झाली नसती. शिवाय पायउतार झाल्यानंतर शत्रूने लगट केल्यावर पालखींत व नंतर घोड्या बर चसण्यांत जी विशेष धांदल उतन्न होऊन तो पकडला गेला, तितक्या सहज रित्या व लवकर तो पहिल्यानेच पालखीत असता तर, पकडला जाण्याचा संभव पुष्कळच कमी होता, परंतु पहिल्या पासून सारख्या चुका होत गेल्या मुळे विजयानगरच्या सैन्याचा पराभव होऊन रामरायास प्राणास मुकावें लागले. तथापि चुकीची ही परंपरा येथेही थांबली नाहीं. रामरायाचे उभयतांही बंधू शर