पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९० )

कीं, हिंदुस्थानांतील लोक हे बोलण्यांत सत्यभाषण व न्याय देण्यांत निपूण म्हणून प्रसिद्ध आहेत; त्या प्रमाणेच इद्रीसी यानें अकराव्या शतकांत लिहिलेल्या आपल्या भुगोलाच्या ग्रंथात अर्से लिहिले आहे कीं, हिंदुस्थानवासीयांचा कल जन्मतःच न्यायाच्या बाजूचा असून ते आपल्या कोणत्याही कृतींत न्यायाचा त्याग करीत नाहींत; त्यांचा विश्वासू स्वभाव, इमानी आचरण, व आपल्या वचनाला जागण्याची त्यांची तत्परता, हीं जगजाहीर असून या श्रेष्ट गुणाबद्दल ते इतके प्रसिद्ध आहेत कीं, - जगाच्या सर्व भागांतून पुष्कळ जन समाज त्या देशांत सारखा जात असतो; याच शतकांत मार्कपोलो यानें असे उद्गार काढिले आहेत कीं, सर्व जगति ब्राह्मण हे उत्तम व्यापारी असून अत्यंत सत्य- प्रीय आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षांत ठेविली पाहिजे; कारण जगांतील कोण- त्याही गोष्टी करितां ते कधींदी असत्य भाषण करणार नाहींत; त्या प्रमाणेच कमालुद्दीन-इब्द-रझाक समर कंदी या नांवाचा एक मनुष्य खोकनचा वकील म्हणून ३० सन १४१३ ते इ० सन १४४० पर्यंत कालीकतच्या राजा जवळ, आणि इ० सन १४४० ते इ० सन १४४५ पर्यंत विजया नगरच्या राजाजवळ वकील म्हणून होता. तो म्हणतो:- या ( हिंदुस्थान ) देशांत व्यापारी लोक पूर्णपणें सुरक्षित आहेत. त्या प्रमाणेच प्रसिद्ध अनुल फज्ल हा असं म्हणतो कीं, हिंदूलोक हे सत्याची भक्ति करणारे आहेत, आणि त्यांच्या सर्व व्यवहारांत ते इमानाने वागतात; प्रसिद्ध इंग्रज मुत्सद्दी सर जान मालकम हा असे म्हणतो की, त्यांचे धैर्य ज्या प्रमाणे अवर्णनीय आहे त्या प्रमाणेच त्यांची सत्यप्रीयताही अवर्णनीय आहे. तसेच कर्नल स्टीमन या नांवाचा एक प्रसिद्ध इंग्रज अधिकारी पूर्वी हिंदुस्थानांत होऊन गेला; त्यास इतर युरोपियन अधिका- ज्यांच्या मानाने हिंदू लोकांच्या शीलाविपर्थी अधिक ज्ञान प्राप्त होण्याची पुष्कळच संधी मिळली असून त्याने हिंदू लोकां विषयीं असें मननीय उद्रार काढिले आहेत कीं, असत्य भाषण, अथवा एकाच खेड्यांतील मंडळींत आपसांत खोटे बोलणे, है हिंदू लोकांस बहुतेक माहीत नाहीं, निव्वळ अख्त्य भाषण करण्यावरच एखाद्या मनुष्याची मिळकत, स्वातंत्र्य, आणि प्रत्यक्ष अस्तित्व हीं, ज्यांत अवलंबून आहेत, असे माझ्यापुढे शंकडों खटले आले; परंतु त्यातल्या प्रत्येक मनुष्याने खोटे बोलणे साफ नाकारून सत्य तेंच सांगितले. कर्नल स्लीमनचा हिंदू लोकां विषयींचा हा अभिप्राय अत्यंत