पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९२ )

बास धरून वागणे, सर्व भूतमात्रांन्या ठायीं दया दाखविणे, द्विज, देव, आणि अतिथी यांची पूजा करणे हाच सन्मार्ग आहे, असे मुनीजन सांगत आले आहेत त्याच मार्गाने आपण गेले पाहिजे; त्याप्रमाणेच पुढे वनवासाहून परत आल्यावर राज्यपदाचा स्वीकार करिताना तो म्हणला. - लक्ष्मणा, भी तुला खरो- खर सांगतो कीं संपत्ति, वैभव, व राज्यपद, यांचा स्वीकार मी तुमच्यासाठीं करीत आहे. आपणा सर्व बंधूत ऐक्य असावें, व सर्वाचं कल्याण व्हावे म्हणून मी राज्यपदाचा अंगिकार करितो, हें तुला सत्यास स्मरून सांगतो; कारण सर्व जगाचे राज्य मिळविणे मला असाध्य नाहीं: परंतु अधर्माने मला इंद्रपद मिळत असले तरी ते सुद्धा मी स्वीकारणार नाहीं. त्याप्रमाणेच महाभारत या हिंदूलोकांच्या दुसऱ्या, उज्वल, अलौकिक, व सन्मार्ग- दर्शक ग्रंथांतून हिंदूलोकांच्या राष्ट्रीय शीलाबद्दल कोणत्या विशिष्ट गोष्टीवर विशेष जोर दिलेला आहे ? के पितामह भीष्माच्या अलौकिक शीलाच्या चरित्रा-


 † श्रीष्णानें, सत्यवचन, सत्यप्रीती, व सत्यधर्मानुसार वर्तन, आच रणांत आणल्याचें पदोपदर्दी आढळून येते; भारतीय युद्धानंतर श्रीकृष्णाच्या अव तार कृत्याच्या समाप्तीच्या थोडेसे अगोदर अभिमन्यूची गर्भवती स्त्री प्रसत होऊन तिला मुलगा झाला; परंतु तो मृत स्थितीत उपजला; आर्धी मुळीं पुत्रे हानी दुःखदायक; त्यांतही पांडव वंशाचा भावी अंकूर हा एवढाच व तोही मृत झालेला, त्यामुळे तर अत्यंतच दुःख दायक; अशा स्थितीत त्या मृत पुत्रास घेऊन सर्वजण आक्रोश करीत श्रीकृष्णा जवळ गेले, अ.णि त्यास जिवंत करण्या विषयीं त्यांनी त्याची करुणा भाकिली; त्यावेळी श्रीकृष्णानें त्या बालकास मांडीवर घेऊन त्यास जिवंत करण्याकरिता मोठ्याने खालील बाक्यांचा उच्चार केला – “मी आज पर्यंत थट्टेने सुद्धां कधींही असत्य भाषण केले नाहीं; व युद्ध परांगमुख दोऊन समरभूमीवरून कर्धीही माघारा परतलों नाहीं, या माझ्या पुण्यानें हें मृत बालक पुन्हा जिंवत होवो; ज्या अर्थी धर्म व धर्माचे अधिष्टाते ब्राह्मण हे सदोदित मला प्रीय आहेत त्या अर्थी अभिमन्यूचा मृत पुत्र पुन्हा जिवंत होवी; मी विजयांत मुद्धां दुसऱ्याचा केव्हाही विरोध केला नाहीं है जर सत्य असेल तर त्या सत्याने या मृत बालकाचा प्राण परत येवो; आणि कंस व केशी यांचा मी धर्म न्यायानें वध केला ही गोष्ट जर सत्य असेल तर त्या सत्याने हे मृत बालक पुन्हा सचेतन होवो. "