पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२६ )


'तेथील देवालयांत सत्तर हात उंचीची महेश्वराची मूर्ती होती, असं त्याने आपल्या प्रवास वृत्तांत लिहिलेले आहे. म्हणजे पूर्वकालापासून मूर्तिपूजही हिंदूधर्मात प्रधान म्हणून मानिली गेली असून, तशाच प्रकारच हिंदुधर्माचे रहस्य म्हणून उदाहरणा दाखल एक गोष्ट या ठिकाणी दिग्दर्शित करणे आवश्यक आहे; ती ही की, हिंदूसमाजा प्रमाणे पृथ्वीवरील इनर कोणताही समाज, पुत्र हा पित्याच्या उद्धारासाठी आहे, असे मानीत नाहीं; भती प्राचीनकाळ-भविष्योत्तर पुराण अस्तित्वात आले त्यावेळी पुत्र संतान असणे आवश्यक आहे, अशी ज्याप्रमाण समजूत होती, तशीच ती आजच्या मित्तीसही कायम आहे. पुत्र असणे हे प्रापंचिक दृष्ट्याच केवळ आवश्यक आहे असे नसून धार्मिक दृष्ट्याही आवश्यक आहे, असे कित्येक शतकापासूनच हिंदूलोक मानीत आले आहेत, आणि मनुस्मृतींत "पुं" या नांवाच्या नरकापासून पितरांना पुत्र तारितो, या साठी त्याढा पुत्र म्हणतात " असा उल्लेख आहे. * त्या प्रमाणेच "कुलक्षय झाला असता] प्राचीन काळापासून चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात; धर्माचा नाश झाला म्हणजे सर्व कुळांमध्ये भधर्माचे प्राबल्य चालू होतें: अधर्माच्या प्रावल्यामुळे कुल स्त्रिया बित्रडतान: त्यामुळे वर्ण संकर होतो, आणि चर्ण संकर झाला म्हणजे कुलक्षय करणारांना आणि त्या कुळालाही नरकाची प्राप्ती निश्चित होते. कारण पिंडदान आणि तर्पण या किया लुप्त झाल्या- -मुळे त्यांचे पितर पतन पावतात. असे गीतंतील बचन आहे. अशा प्रकारचें विशिष्ट रद्दस्य असलेला हा हिंदूधर्म अनेक वावटळींतून बचावून आज तागवित जिवंत राहिला आहे; अजमासे इ० सन १२९० च्या पूर्वी पासूनवैष्णव मताचा अथवा भागवत धर्माचा महाराष्ट्रांत मोठ्या जोरार्ने प्रसार होण्यास सुरवात झाली आहे; महाराष्ट्रति आज सुमारे सातशे वर्षे वारकरी सांप्रदाय चालू असून



  • पुंनाम्नो नरकायस्मा त्रायने पितरं सुतः ।

तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा ||

मनुस्मृती ९-१३८

+ संकरो नरका यैव कुलध्नानां कुल स्थच | "पतंति पितरी ह्येष लुप्त पिंडोदक क्रियाः ॥

गीता १-४२०