पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२७)


गेल्या " पांचशे वर्षांत सुमारे पन्नास साधूसंत या देशांत जन्मास आले; त्यांतील ही स्त्रिया 'थोडे बहुत हिंदुत्व पत्करलेले मुसलमान निम्मे ब्राह्मण, व इतरां पैकी सोनार, मराठे, कुणबी, शिंपी, माळी, कुंभार, व महार, होते; कांही वेश्या व टिकी होत्या. या धर्म जाग्रतीचें विशेष महत्व हे आहे की, धर्माच्या उन्नत तत्वांचा पगडा एकाद्या विशिष्ट वर्गावरच न बसता समाजातील सर्वत्र वर्गाच्या लोकांच्या अंतःकरणावर बसला होता. व स्त्रिया व पुरुष, उच्च व नीच, सुशिक्षीत व अशिक्षित, हिंदूव मुसलमान' हे 'सव जण या धर्म विचारांच्या ना खाली आले होते. सार्वजनिक जागृती जेथें आहे अशा ठिकाणा खेरीज करून इतरत्र या प्रकारचा चमत्कारिक धार्मिक परिणाम जगाच्या पाठीवर कोणत्याही देशांत घडून आलेला इतिहासावरून दिसून येत नाही. पंजाबांत जानकानें हिंदू व मुसलमान यांच्या मध्यें धार्मिक ऐक्य करण्याचा महत्प्रयत्न केला. पूर्वेस बंगा- क्यांत चैतन्याने लोकांस शनि व काली यांच्या उपासने पासून परावृत्त करून भागवत धर्माकडे ओढण्याचा प्रयत्न केला. रामनंद, व कबीर, नुलसीदास, व सुरदास, जयदेव, व राईदास, या सर्वांनी आपापल्या परीने धर्मोन्नतीच्या कार्यास हातभार लाविला. याचा परिणाम इष्ट व टिकाऊ असाच झाला. परंतु महाराष्ट्रां- तील संतांनी त्यांच्या पेक्षा ही विशेष महत्वाची कामगिरी केली. चांगदेव ब ज्ञानदेव, निवृत्तों आणि सोपान, मुक्ताबाई आणि जनी, आकाचाई आणि वेणूबाई नामदेव आणि एकनाथ, रामदास आणि तुकाराम, शेख महंमद आणि शांति चहामनी, दामाजी आणि उद्धव, भानूदास आणि कूर्मदास, बोदले बुवा आणि संताप, केशव स्वामी आणि जयराम स्वामी, नरसिंह स्वामी आणि रंग- नाथ स्वामी, चोखा भेळा आणि दोघे कुंभार, नरहरी सोनार आणि सांवता माळी, बहिराम भट आणि गणेशनाथ, जनार्दन पंत आणि मुधोपंत हे व इतर कित्येक यांच्या चरित्रांवरून महाराष्ट्रांत ही धर्म जागृतीची चळवळ किती महत्वास चढली होती, हे दिसून येणार आहे. ” ( न्या० रानडे कृत “The Rise of the Marhatts Power" हे पुस्तक पहा.) हिंदू धर्माप्रमाणेच, त्यांची संस्कृतीही इतकी महत्वास चढलेली होती, की तिजबर मुसलमानांची च्छाप, ते राज्यकर्ते झाले तरी सुद्धा बसली नाहीं; ही गोष्ट युरोपियन इतिहासकारांनी ही कबूल केली असून मिस्तर भेजर याने आपल्या पुस्तकाव