पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३६)


जेतेही करूं शकत नाहींत. कारडोव्हा, व बगदाद येथील विश्वविद्यालयांची आठ- वण आजही विद्याभिलाषी लोकांना होत आहे. कारडोव्हा येथें ६०० मशीदीं, ९०० स्नानगृहे व दोनलक्ष निवासस्थानें होतीं. स्पेनच्या मुसलमान राजांनीं केलेले कायदे पहिल्या प्रतीच्या ८० नगरांत, व दुसन्या आणि तिसऱ्या प्रतीच्या ३०० शहरांतून चालत असत. त्याकाळी लोक अत्यंत संपन्न व धनवान असून, पुष्कळ लोक शेती करीत असत. स्पेनच्या ज्या लोकांनी, प्रजा अगर गुलाम या पेशाने मुसलमानी धर्म स्वीकारिला, ते ताबडतोब स्वतंत्र होऊन, राज्यकर्त्या मुसल मानांच्या बरोबरीचे होत असत. बगदादच्या खलिफांचें वर्णन इतिहासकारांनी

अत्यंत सुंदर केलेले आहे. बगदाद शहराला " शांतिनगर " असे म्हणत.



 +बगदाद येथील खलिफास आब्बासी खलीफा असे म्हणतात; त्यांचे राज्य बगदाद येथे पांचशे वर्षे मोठ्या भरभराटीत होतें; आणि गिबनच्या म्हणण्या प्रमाणे, मुसलमानांच्या पहिल्या शंभर दोनशे वर्षांत, सत्ता व ऐश्वर्य या दोन्हींही बाबतींत खलिफांची बरोबरी करणारे दुसरे कोणतेही राजे पृथ्वीवर नव्हते; व सिंधू, अमुदार्या व तेगस या तीन्हींही नद्यांच्या काठी असलेल्या प्रदेशांत खलि फांचा शब्द नेहमीं मान्य केला जात होता. अरब विद्वानांनी या ठिकाणच्या खलिफांच्या पदरीं राहून शास्त्र, तत्वज्ञान, व वांग्मय, वगैरे बावतींत अलौकिक कीर्ती मिळविली होती. प्रसिद्ध बादशहा हारून-अ- रशीद ( कारकीर्द इ० सन ७८६ ते ८०९ पर्यंत ) याच्या कारकीर्दीत, व्यापाराची वृद्धी झाली, व त्याने मशिदी, दवाखाने, विद्यालयें, धर्मशाळा, रस्ते, पूल, कालवे, वगैरे अनेक लोको- पयोग कृत्यें केली; हा खलिफा रात्री वेप पालटून बगदाद शहरांत फिरत असे; याच्याच संबंध (आणि याचा दुसरा मुलगा अब्दुल्ला अल-मामून याच्या संबंधी) " अरेबियन नाईट्स” अथवा “ अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी " या पुस्तकांत उल्लेख आलेला असून व तेच या गोष्टींचे नायक असून हे पुस्तक विशेष वाचनीय, मनोरंजक, बोधप्रद व विविध माहिती पूर्ण, असे आहे; हारून- अल्- रशीद याचा दुसरा मुलगा अब्दुल्ला अल्-मामून याची कारकीर्द तर विशे- षच प्रसिद्ध असून याच्या कारकीर्दीत वांग्मय विषयक बाबतींची भतीशय प्रगति झाली; व गणित, भूगोल, खगोल, वैद्यक, वगैरे शास्त्रीय विषयांत अरबांनी प्राविण्य मिळविले; इतकंच नाही तर त्यांचे या बाबतीतील उद्योग आजही सर्व मान्य