पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३७ )


वगंदाद येथील खलीफाच्या दरबारची जागा सोन्यामोत्यांनी मढविलेली होती; इमारतींना स्पॅनिश, आकिन, ग्रीक, वगैरे विविध ठिकाणचे व रंगाचे सुंदर संगमरवरी दगड जडविले होते. खलिफांच्या उद्यानांत हजारों कारंजी असून

'त्यातील एक' तर शुद्ध पाने भरलेले असे. विद्यालयांना अत्यंत उदारहस्ताने देणग्या मिळते. सुलतानाच्या एका बजिरानें बगदादमध्ये एक विद्या



" म्हणून गणले गेलेले आहेत. हा बादशहा मोठा प्रजादक्ष असून, आपल्या लोकांनी ज्ञान संपादन करावे अशा इच्छेने त्याने आपल्या सर्व राज्यभर विद्या- लयें स्थापन करून त्यांच्या खर्चाचीही स्वतंत्र व्यवस्था करून दिली होती. शिवाय, विविक्षित जाती कॅरितांच त्यानें ही व्यवस्था केली नसून सर्व जातीच्या लोकांस शिक्षण देण्याकरिता त्याने ही व्यवस्था केली होती. हा खलिफा विद्वा- नांचा भोक्ता असून अनेक कवी, तत्ववेत्ते, व पंडित, त्यांच्या दरबारी नेहमीं येत असत; याच्या कारकीर्दीत ज्योतिष शास्त्राची प्रगति होऊन अनेक नवीन शोध लावण्यांत आले; शिवाय त्यानें संस्कृत, ग्रोक, व खाल्डी, वगैरे भागांतील महत्वाच्या व सर्वमान्य अशी वांग्मय विषयक ग्रंथाची भाषांतरें करवून त प्रसिद्ध केलीं, प अशा रीतीने आपल्या देशांतील वांग्मय ज्ञानांत त्याने विशेष मौल्यवान भर घातिली. या उभयता खलिफांच्या कारकीर्दीत अतीशय विद्या "वृद्धि झाली; कारण दर एक मशीदीला विद्यालय जोडलेले होतें, आणि या खलिफांच्या सर्व राज्यात विद्यालय नाहीं असे एकही शहर नव्हते; या उभय तांच्या कारकीर्दीत अनेक तत्ववेत्ते, इतिहासकार, गणिती, ज्योतिषी, 'वं विद्वान मंडळी निर्माण झाली; शिवाय याच अरये लोकांनी स्वतःच्या बुद्धिबलानें मुसलमानी कायदा निर्माण केला. हा कायदा आजच्या कालांत, ही सर्व मान्य असून रोमन कायद्याच्या खालोखाल त्यास मान मिळतो; थोडक्यात म्हणजे अरब लोकांनींच भूगोल, खगोल, भूमिती अंकगणीत, चिजगणीत, वैद्यक, वन- स्वतीशास्त्र, प्राणिशास्त्र, वगैरे अनेक विषयांचे ज्ञान आर्य व ग्रोक लोकांपासून मिळवून त्याची अतीशय प्रगति केली; होकायंत्र व बंदुकीची दारू अरव लोकांनीं प्रचारांत आणिली; मोठमोठ्या पाठशाळा व पुस्तकालयें निर्माण केली, आणि बगदाद, केरो, कोडोंव्हा वगैरे ठिकाणी मोठमोठी विद्यालय स्थापन करून अपल्या राज्यभर, व युरोपभरही ज्ञानवृद्धि केली.