पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७२ )

त्यांनां जबरदस्त ठोकर बसत गेली असूनही, त्या त्या प्रत्येक आपत्तीच्या प्रसंगांतून, त्यांनी पुन्हा पुन्हां वर डोकें काढून, आपली कर्तबगारी मोठ्या शर्तीनें, एक दिलानें, व एक जुटीनें, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या, व जगाच्या पूर्णपणे निदर्शनास आणून देऊन आपले नांव. हिंदुस्थानच्याच फक्त नव्हें, तर जगा- च्याही इतिहासात अजरामर करून ठेविले असल्यामुळे या दृष्टीनें “ मराठ्यांचा इतिहास " अत्यंत महत्वाचा व चिरस्मरणीय म्हणून गणला गेलेला आहे; मराठा साम्राज्य अपसांतील फाटाफूट, मतभेद, वैमनस्यें, अव्यवस्थित व बेशिस्त राज्य व युद्ध कारभार, नालायक राज्यकर्त्यांची परंपरा, वगैरे अनेक कारणां- मुळे पुढील काळात दुर्बळ झाले; त्यामुळे इंग्रजासारख्या व्यवस्थित, शिस्तीच्या सुधारलेल्या, व सामुदायिक कार्य एकोप्याने सिद्धीस नेण्याची हतोटी साधलेल्या प्रतिस्पर्ध्यापुढें त्याचा टिकाव लागला नाहीं, ही गोष्ट अगदीं खरी आहे; तरी सुद्धां इ० सन १८१८ मध्ये पुण्याची पेशवाई नष्ट झाली, आणि इ० सन १८४८ मध्ये सातारच्या छत्रपतीचे राज्य खालसा झाले तरी मुद्धां-त्यामुळे " मराठ्यांचा इतिहास " या शब्दांनो, अथवा त्यांच्या इतिहासाला असलेले महत्त्व कोणत्याही प्रकारें तिळमात्रही कमी न होतां तें कायम आहे, व काय- मचच राहणारे ही आहे; आणि या ठिकाणी थोडक्यांत, अंगदर्दी थोड्या वाक्यांत, म्हणावयाचे म्हणजे, महाराष्ट्रातील मराठ्यांचे चिमुकले राज्य पुढील काळांत “हिंदुस्थानांतील मराठा साम्राज्या" बनून आणि स्वतःवर आलेल्या निर्मूलन होण्याच्या अनेक भयंकर प्रसंगांतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हां जिवंत व पूर्ववत् सामर्थ्यवान आणि अधिक बलाढ्य होत जाऊन, व आपल्या प्रत्येक कट्टया व सामर्थ्यवान प्रतिस्पर्थ्यास आपल्या सामर्थ्याची व कर्तृत्वाची हरएक आवश्यक प्रसंग सतत जिवंत ओळख देत राहून याच मराठा साम्रा- ज्याचा, आणि मराठा मंडळाचा, सर्व हिंदुस्थानभर कांहीं काळपर्यंत सारखा जयजयकार होत राहिलेला आहे.