पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४० )

झालेल्या युद्धांत तो मारला गेला; तेव्हां त्याचा भाऊ दुसरा गजेंद्र व नंतर वीर राजेंद्र हा गादीवर आला; हा राज्यकर्ता शूर असून त्याने चालुक्यांश युद्ध करून त्यांचा पराजय केला. त्यानंतर अधि राजेंद्र वगैरे पुरुष गादीवर आले; त्यांपैकी शेवटचा महत्त्वाचा व नांव घेण्यासारखा तिसरा कुलोत्तुंग हा राजा असुन त्याने इ. सन १२८७ पासून इ. सन १३२७ पर्यंत सतत चाळीस वर्षे राज्य केले; त्यानंतर मलिक काफूरच्या स्वारीचा परिणाम याही राज्यास मोठया अनिष्ट रीतीनें भोगावा लागून तें राज्य निर्बल होत होत पुढे नामशेष होऊन गेले; विजयानगर में ठिकाण याच राज्यांत असून, इ० सन १३३५ मध्ये तेथील हिंदू राज्य उदयास येऊन त्या राज्याचा पुढे काहीं काळपर्यंत अत्यंत उत्कर्ष झाला.
 तिसरें, म्हणजे केरळ अथवा केरळपुत्र है राज्य कोंकणच्या खालीं दक्षिणेस मलबार किनान्यावर असून वंजी अथवा कोचीन जवळचें तिरूकरूर ह्या ठिकाणीं त्या राज्याची प्राचीन राजधानी होती; अशोकाच्या काळापूर्वी 'चेर' या नांवाचें एक राज्य होतें, तेंच हैं केरळ राज्य असावें असा तर्क आहे; कारण या राज्याची भाषा, ही चोल व पांड्य या देशाची म्हणजे तामिल ही भाषा नसून, केरळ देशा- प्रमाणेच, मल्याळ, अथवा मल्याळम् ही होती. शिवाय अशोकाच्या लेखांत चेर या नांवाच्या राज्याचा उल्लेख केलेला नसून केरळ व सत्यपुत्र या दोन राज्यांचाच कायतो उल्लेख केलेला आहे; चवथें म्हणजे सत्यपुत्र है राज्य होय; केरळ देशाची इ० सन ११२५ पर्यंतची माहिती फारशी उपलब्ध नाहीं; पण या सत्यपुत्र राज्यासंबंधी तर, इतर कोणतीच विश्वसनीय हकीकत उपलब्ध नसून या राज्याचे नांव अशोकाच्या लेखात मात्र दिलेले आढळून येतें, व त्यांवरून 'सत्यपुत्र' हे राज्य त्यावेळीं अस्तित्वांत होर्ते, एवढीच गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते.
 दक्षिण हिंदुस्थानांतील वर लिहिलेला हा सर्व प्रदेश मोठा सधन व सुधार- खेला असून त्यांतील बहुतेक लोक परदेशाशीं व्यापार करीत असत; आणि मुख्यतः इताली व मिसर देशाशीं त्यांचा मोठ्या जोराचा व्यापार चालत असून हिंदुस्थां- नांतून विशेषतः मिरीं, मोतीं व माणकें - मुख्यतः बेरिल या नांवाचीं उत्तम रत्ने वे तिकडे पाठवीत असत; व त्यासंबंधीं कोईमतूरजवळ पडयूर, कितूरनजीक पुन्यात