पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७४ )

" राजाधिराज " महाभहारक, जयसिंहदेव, व त्रिजगत्यति वगैरे नांवें होतीं शिवाय त्यास " गुजराथ देशाचें भूषण " व "चालुक्य वंशाचा कुलदीप" अशींहीं नामाभिधाने होतीं त्यानें गिरनार प्रांताचा राजा खेंगार याचा पराभव करून सोरठ प्रांत आपल्या अमलाखालीं आणिला, आणि त्या प्रांताचा तीन वर्षांचा वसूल खर्ची घालून त्यानें नेमीनाथाचे एक मोठें मंदीर बांधिलें; त्याप्रमाणेच मालाबाधिपतीशीं सतत बारा वर्षे युद्ध करून त्याने तेथील राजा यशोवर्मा याचा


वाटले, व सोमनाथाचें दर्शन घेतल्याशिवाय ती तशीच परतून राजधानींत माघारी आली; राजा सिद्धराज मातेस भेटण्यास गेला, आणि यात्रा केल्याशिवाय परत येण्यास काय कारण घडले याबद्दल त्याने तपास केला; तेव्हां यात्रेकरू- वरील करासंबंधीची हकीकत सांगून " हा कर माफ झाला नाही तर मी अन्न- पाणी घेणार नाहीं " असे तिने आपल्या मुलास सांगितले; मातेचे हे निर्वाणीचे शब्द ऐकून मातृभक्त सिद्धराजाची स्थिती फार अडचणीची झाली; कारण वरील कराचें उत्पन्न अजमासे ७२ लाख रुपयांचे होते; त्यामुळे एवढी मोठी वसुलीच्या बाबींतील रक्कम सोडून दिल्यास सांपत्तिकदृष्टया राज्याचे भयंकर नुकसान होणार ही गोष्ट उघड होती; उलट पक्षीं आईची आज्ञा उल्लंघन केल्याचा दोष, व तिनें अन्न पाणी न घेतल्यानें त्यामुळे ती मृत्यु पावल्यास अप्रत्यक्षपणें मातृहत्येचें भयंकर पाप, आपल्या माथीं बसणार हीही गोष्ट तितकीच उघड होती; तथापि शेवटीं सांपत्तिक नुकसानीचे कोणतेही महत्व - हा कर माफ केल्यास राज्याच्या वसूलीचे अत्यंत नुकसान होईल असें त्याच्या मंत्रिजनानी त्यास आग्रहानें बजा- विले असताही लक्षांत न घेतां त्याने तो कर माफ करून आपल्या मातोश्रीच्या हाताने मंदिरांत तसे उदक सोडविले, तेव्हा सोमनाथास पुष्कळ मौल्यवान् देणग्या देऊन राजमाता मैलनदेवी दिने आपली यात्रा पूर्ण केली.
 "If the whole world were put into one Scale and my mother into the other, world would kick the beam. Lord Langdale." ( तराजूच्या एका पारड्यांत सर्व जग बसविलें, आणि दुसऱ्यांत जर माझ्या भाईस बसविलें, तर माझ्या आईचे वजनच जगाच्या पारड्याच्या वजनाहून अधिक भरेल. ) यावरून मातेचें केवढे महत्त्व मानलेले आहे, हे कोणासही सहज समजून येईल; त्याप्रमाणेच " मातेप्रमाणे अन्य देवत नाहीं " ही व्यवहा- रांतील म्हणही प्रसिद्ध आहेच.