पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९४)

केले x ( काव्येतिहाससंग्रह पत्रे यादी, नंबर ४३८ पहा ). पूर्वीच्या वंशांतील मूर्तुजा या नांवाचा एक दहा वर्षांचा मुलगा, जुन्नरच्या पश्चिमेस तीस मैलांवर असलेल्या जीवधन ऊर्फ अंजराई येथील किल्लयांत कैदेत होता, त्यास तेथून मुक्त करून ( इ. सन १६३३ सप्टेंबर ) भीमगड येथे आणून तख्तावर बसविलें, निजामशाहीतील अनेक कर्तबगार मंडळींची मदत मिळ- चून त्यानें त्या राज्याचा अंमल पुन्हां पूर्वीप्रमाणे चालू केला. बरेच किल्ले व प्रदेश आपल्या ताब्यांत मिळविले आणि कित्येक हुषार ब्राम्हण आपल्या नौकरीत ठेवून त्यांच्या सल्लयानें तो कारभार पाहूं लागला.


 X काव्येतिहास संग्रह पत्र यादी नंबर ४३८ यांत शहाजी भोंसले याची कैफियत दिली आहे; ती पुष्कळ मोठी आहे; म्हणून त्यांतील मह त्वाचा मजकूर थोडक्यांत खाली दिला आहे तोः--

 शहाजी महाराज भीमगडी जाताच निजामशाही प्रांत पुणे व जालना बालेघाट पर्यंत जुन्नर व अहंमदनगर, व संगमनेर, व नाशीक व त्रिंबक पर्यंत घेतलें; आणि सात आठ हजार स्वार ठेवून प्रांत लुटू लागले. इरादतखान दौलताबादेस होते; त्यांस मालोजी भोसले यांजकडून स्नेह केला, आणि उमेदवार शहाजहां ( शहाजहान ) पादशहा याच्या कृपेचें म्हणून मनसब बेवीस हजारी करार करून फर्मान शहाजी महाराज यांच्या नांवें व वस्त्रे पादशहाची आणून दिली. आणि शहाजी महाराज ज्याप्रमाणें सांगतील त्याप्रमाणे दिलोहून आणवून देऊन शहाजहांचे चाकर करून विजापूरच्या पादशहाचा मुलूक (?) असे इरादतखान याच्या चित्तांत होतें. हे वृत्त महाराजास समजून ते हुशारच होते. मुरारपंतास न कळतो खवासखान याजकडून कागद पत्रें येत होतीं. शहाजी महाराज याणी लिहिलें कीं, तुम्हां- कडून कांहीं उपराळा (मदत ) जहाला असता आम्ही पुनरपि निजामशाही उभी करितो. त्यास खवासखान याच्या चित्तांत होते; परंतु मुस्तफाखान याच्या विचारास येईना. खवासखान दौलताबादेस गेले. अजुर्देपणानें ( खिन्न तेनें ) इरादतखान याश स्नेह केला; आणि शहाजी महाराज यांचें भय होतें, परंतु ही मसलत, याजवरून बहुत संतोष वाटला, आणि पत्राचें उत्तर पाठ-