पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९५ )

 या वेळी निजामशाही राज्यांतील तळकोंकण प्रांतावर, सिद्दी सैफ या नांवाचा एक सरदार त्या दरबारातर्फे कारभार पहात होता; त्यास शहाजीनें “ नवीन निजामशहाचें स्वामित्व मान्य करून त्यास मुजरा करण्यास यावें, व आम्हास मदत करावी, " म्हणून कळविलें. परंतु त्याने शहाजीचें हें म्हणणें


विलें कीं, वंश निजामशाही म्हणून गादीवर बसवावें असे लिहिलें. मुरारपंत याजबरोघर फौज देऊन कुमकेस शहाजी महाराजांकडे रवाना केलें. शहाजी महाराज श्रीवर्धन किल्ल्याहून निघून कोंकणांत जाऊन निजामशाही वंश कैदेत होते, त्यांतून दहा वर्षांचा मूल मुरतजा नामें होता त्यास आणून भीमगडीं येऊन तक्तावर बसविलें आणि प्रांत घेण्याच्या उद्योगास लागले. सिद्दी साबासफैखान कोंकण प्रांत घेऊन भिवंडीस होता, त्यांस शहाजी महाराज यांणी पत्र आपल्या व मुरारपंत यांच्या नांवें तुम्ही निजामशहास येऊन भेटावें असे लिहिलें. तेव्हां महाराजांच्या लिहिण्यास राजी न होतां अद्दिलशहाची चाकरी करावी म्हणून कोंकण प्रांत शहाजी महाराज यांच्या स्वाधीन करून निघाले. तो शहाजी महाराज यांनी फौज त्याच्या पाठलागास पाठविली. तेव्हां उभय लष्करची गांठ पडून युद्ध होऊं लागलें, दोहीं. कडील मनुष्यें बहुत जायां झाल. सिद्धी अंबर तोफखानाचा सरदार होता, त्यास कैद केला, आणि सफैखान याच्याही फौजेस वेढा दिला. इतक्यांत मुरारपंताकडील फौज कुमकेस येऊन सफेखान यास घेऊन नंतर विजापुरास जाऊन पादशहाची भेट घेतली. बादशहांनी त्यास दोन लक्ष होन देऊन हरपनहल्ली: येथें ठेविले. नंतर ( ते तेथें ) कांही दिवसांनी मृत्यू पावले. शहाजी महाराजांनी श्रीनिवासराव यांस मेजवानीस बोलावून कैद करून त्यांजकडील किल्ले व प्रांत घेऊन मुरतजा पादशहास जुन्नरास घेऊन येऊन द्रव्य व सरंजामही बहुत संग्रह केला. दहाबारा हजार स्वार जमविले.


 + हरपनहली हे ठिकाण व तालुक्याचें गांव इलीं मद्रास इलाख्यांतील बल्लारी जिल्ह्यांत, बल्लारीपासून ६६ मैलांवर, व हॉस्पेट रेलवे स्टेशनपासून ५५ मैलांवर आहे. हा गांव उत्तम व नीटनेटका वसलेला असून त्यामुळे प्रेक्षणीय आहे; व येथें जैन लोकांचीही एक वसाहत आहे.