पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९६)

मान्य केलें नाहीं; तथापि महाडपासून जव्हारपर्यंतची सर्व तळकोंकणपट्टी त्यानें शहाजीच्या हवाली केली; व विजापूर दरबारों नौकरी करण्याच्या उद्दे- शानें तो तिकडे जाण्यास निघाला. तेव्हां शहाजीनें पाबळ कडूस जवळील खेड या गांवीं त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव केला; त्यास खेडच्या ठाण्यांत कोंडून त्याच्या सैन्याचा अतीशय नाश उडविला; व अखेरीस मुरारपंतानें मध्यस्थी केल्यामुळेच तो बचावून सुरक्षितपणे विजापूर येथे गेला. अशा रीतीनें सर्व कोंकणपट्टी शहाजांच्या ताब्यांत आली. शिवाय त्यानें पूर्वेस अहंमदनगरपर्यंत व दक्षिणेस निरानदीपासून चांदवडच्या + किल्लघापर्यंत सर्व प्रदेश आपल्या हस्तगत करून घेतला व तो पुन्हांही पूर्वीप्रमाणेच बलाढ्य होऊन बसला.

 बालराजा मूर्तुजा यांस भीमगड येथे तक्तावर बसविण्याच्या वेळी विजा- पूरकरातर्फे मुरारपंत ऊर्फ मुरार जगदेव हा मुद्दाम तेथें आला होता; नंतर


 + चांदवड है नाशीक जिल्ह्यांत एक तालुक्याचे ठिकाण असून ते नाशीक- पासून ईशान्येस अजमार्से चाळीस मैलांवर व जी. आय. पी. रेल्वेच्या लासलगांव रेलवे स्टेशनपासून सडकेनें अजमार्से बारा मैलांवर आहे. हे गांव " चांद- वडच्या डोंगराच्या " पायथ्याशी वसलेले असून डोंगरावर एक किल्ला आहे; तो समुद्रसपाटीपासून ३९९४ फूट उंचीवर असून किल्ल्याची चढण अव- घड आहे. खानदेश व मुंबई मागीमधील महत्वाच्या घाटाजवळील . चांद- वडचा किल्ला " हा नाक्याचा असल्यामुळे पूर्वकाळी तो अतीशय महत्वाचा म्हणून गणला गेलेला होता. चांदवड हे गांव मोगलाईत महत्वाची व्यापारी पेठ असून ते पूर्वी होळकराच्या ताब्यांत होतें. या ठिकाणी होळकराचा “रंग- महाल " या नांवाचा एक मोठा सुंदर व भव्य वाडा आहे; शिवाय येथें रेणुका व कालिका देवींचीं प्रसिद्ध देवालये आहेत; तेथून जवळच चांदव- डचा डोंगरी किल्ला असून किल्लयांत पूर्वी होळकराची टांकसाळ होती.

 लासलगांव स्टेशनपासून तीन मैलांवर मराठ्यांचा प्रसिद्ध व शूर सर- दार विठ्ठल शिवदेव दाणी विंचूरकर याच्या संस्थानचें मुख्य ठिकाण विचूर हैं गांव आहे.