पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१००)

प्रमाणे सुजानें तिकडे जाऊन किल्लयास वेढा घातला; तेव्हां मुरारपंतानें किल्लयांतील लोकांच्या मदतीस आणखी फोज रवाना केली; मोंगल सैन्याश युद्ध चालविले; आणि आपल्या बाजूने उठावणी करून मोंगलांस पायबंद बसविण्याविषयीं शहाजीस निकडीची पत्रे रवाना केली.

 शहाजीस ही हकीकत कळल्याबरोबर त्यानें अहंमदनगरजवळ मोठी फौज जमविली; दौलताबाद व बेदर या प्रांतांवर स्वारी करून तिकडील प्रदेश लूटून फस्त केला; मोंगल लष्कराकडे जाणारी धान्यसामुग्रीची कार- बानें रस्त्यांतच लुटलीं; आणि त्यांचे दळणवळणाचे सर्व मार्ग बंद करून मोंगली सैन्यास अतीशय त्रास दिला. तेव्हां मोहबतखानाने त्याच्यावर पुन्हो स्वतंत्र सैन्याची रवानगी केली; परंतु हें सैन्य नजदीक आल्याबरोबर शहा- जीने लागलीच डोंगरी प्रदेशाचा आश्रय घेतला; त्यामुळे त्या सैन्यास तसेंच परत जावें लागलें; इकडे, हें सैन्य परत गेल्याबरोबर शहाजीनें पुन्हां लागलीच मोंगल सैन्यास त्रास देण्यास सुरुवात केली; आणि चोहोकडून पूर्ण नाकेबंदी करून सुजा व त्याचे मोंगली सैन्य उपाशी मरण्याचा प्रसंग आणिला. त्यामुळे त्या सैन्याचे अतीशय हाल होऊ लागले; आणि त्यांतच अदिलशाही सैन्यानेही बाहेरून सारखा उपद्रव दिला; त्यामुळे अखेरीस नाइलाजानें- पुष्कळ नुकसान सोसून व अपयश घेऊन - वेढा उठवून ( इ० सन १६३४; मे ) सुजा यांस आपल्या सैन्यासह बहाणपुरकडे परत जाणे भाग पडले.

 ही हकीगत शहाजहान यांस कळल्यावर तो अतीशय संतापून गेला; गनीमीकाव्याच्या युद्धानें सतत दहा वर्षे आपल्या सैन्यास शहाजीनें अतीशय सतावून सोडिलें, याबद्दल त्यास शहाजीचा अतीशय राग आला. आपण नाम- शेष केलेली निजामशाही शहाजीनें पुन्हां उभी केली,आपला सर्व खटाटोप व्यर्थ झाला, यामुळे शहाजद्दान चिडीस गेला; विजापूरकर व गोवळकोंडेकर या उभयतांकडून शहाजीस मिळणारी मदत बंद पाडण्याकरितां दक्षिण प्रांताचा ह्याकाळापर्यंत फक्त एकच " खानदेश " या नांवाचा सुभा होता तो मोडून दौलताबाद व अहंमदनगर हे दोन भाग केले; ( इ० सन १६३४ ), खान डौरान व खान झमन या दोन सरदारांना त्यांच्या बरोबर पुष्कळ सैन्य देऊन