पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०२ )

घाटानें निसटून पारगांवाकडे गेला; याप्रमाणे सतत सहा महिने मोंगल सैन्य शहाजच्या पाठीस लागलेलें होतें; तरी एकदां सुद्धा या सैन्याची शहाजीशीं गांठ पडली नाहीं. तथापि एकदा खान ढौरान यानें शहाजीच्या सैन्याच्या एका तुकडीवर हल्ला करून तिचा पूर्ण पराभव केला; पुष्कळ लोकांची कत्तल उडवून तीन हजार लोक कैद केले;व धान्य वगैरे सामुग्रीनें भरलेल्या आठ हजार बैलांचा तांडा आपल्या हस्तगत करून घेतला; परंतु त्यामुळे शहाजीचें फारसें नुकसान झाले नाहीं; उलट त्याचा सारखा पाठलाग करून करून मोगली सैन्य मात्र थकून व त्रासून गेलें; व इतक्यांतच पावसाळा लागल्यामुळे त्या सैन्यास छावणीकरितां मुक्कामास परत जाणे भाग पडलें.

 शहाजीनें दक्षिणेत माजविलेली बंडाळी अजूनही मोडत नाहीं, उलट अधीक वाढत आहे, असे पाहून शहाजहान हा आपणाबरोबर पन्नास हजार फौज घेऊन ताबडतोब दक्षिणेत आला; व दौलताबाद येथे मुक्काम करून राहिला; ( ता० २२ फेब्रुवारी इ० सन १६३६ ). नंतर त्याने लागलीच आपले वकील विजापूरकराकडे पाठविले, आणि अदिलशहाशी असे बोलणें लाविले की, " निजामशाही राज्याचे तुम्ही घेतलेले सर्व किल्ले परत द्यावें; तुम्ही परिंडा किल्ल्यावरून विजापूर येथे नेलेली " मुलुख मैदान " तोफ आम्हांस द्यावी; विशेषतः शहाजीचा पक्ष सोडावा व त्यास अथवा त्याच्या पक्षांतील लोकांस बिलकुल मदत करूं नये, याप्रमाणे वागण्यास तुम्ही कबूल असल्यास निजामशाही अमलाखालील सर्व कोकणपट्टी, सोलापूरचा किल्ला व त्याखालील प्रदेश, तुम्हास देऊं; व त्याप्रमाणे तुम्ही कबूल नसाल तर तुमचेंही राज्य आम्ही निःसंशय वुडवून टाकूं" परंतु अदिलशहानें शहाजहानच्या अटी


खर्डा येथील मोठें युद्ध होऊन ( इ० सन १७९५ ) त्यांत मराठ्यांनी निजा- मावर मोठाच विजय मिळविला.

 या मोहिमेच्या दरम्यान नागलवाडी ( ता० कर्जत) येथे सीना नदीच्या कांठी मराठ्यांच्या सैन्याचा तळ पडला होता; त्या वेळी सोईस्कर जागा कर- ण्यासाठी सिना नदीच्या पात्रांत जमीन करून प्रवाह वळण देऊन पलीकडे सारिला तो अद्याप तसाच आहे.