पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०४ )

गडच्या माचीचा आश्रय घेऊन तिकडील सर्व मार्ग बंद केले; त्यामुळे खान जमानाचा नाइलाज होऊन तो अहंमदनगर येथे परत आला, व शहाजी तेथून निघून पुण्याजवळ येऊन राहिला.

 इकडे शहाजीचा मुलगा संभाजी हा संगमनेर येथे तळ देऊन राहिला होता, त्याच्यावर शाइस्तेखानानें स्वारी केली; ( इ० सन १६३६ मार्च ) व त्यास तेथून हुसकावून लाविलें; तेव्हां संभाजी नाशीक येथे गेला; त्याच्या


 ÷ नाशीक, है शहर इ० सन १८६९ पासून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण झालें आहे; व ऐतिहासिक व धार्मिक दृष्टया है शहर महत्वाचे असून तें गोदावरी नदीच्या कांठी वसलेले आहे; नदीचा प्रवाह शहराच्या उत्तर व पूर्व दिशेनें वहात असून हे शहर जी. आय. पी. रेलवेच्या नाशीकरोड स्टेशन पासून पांच मैलांवर आहे. पुराणांतरी या शहरास पद्मनगर, त्रिकंटक, व जनस्थान अशीं नांवें दिलेली असून मुसलमानी अमलांत त्यांस " गुलछनाबाद " हें नांव होतें. त्यावेळी शहराला गढी व तट होता; तो आतां अगर्दी पडला असून तटाचे भगूर दरवाजा, त्रिंबक दरवाजा, आसराची वेस, त्या वेशी अद्यापि कायम आहेत. ह्या भागास "जुने नाशीक" असे म्हणतात. या भागांत जुम्मा मशीद व पीर जाद्यांचे थडगें असून त्यांस सरकारी नेमणूक आहे; शिवाय " जोग” ह्यांच्या वाड्यांत मदिना येथून सोळाव्या शतकांत आलेल्या शादक- शाह हुसेनी या साधूचें थडगें असून त्याचा दरवर्षी मोठा उरूस भरत असतो. नाशीक हॅ शहर इ० सन १७६२ पासून, म्हणजे पहिल्या माधवराव पेश- व्याच्या कारकीर्दीपासून, विशेष भरभराटीस येण्यास प्रारंभ झाला; पेशव्यांनीं आपणांस राहण्याकरितां तेथे एक वाडा बांधला, व ते मधून मधून तेथे येऊन राहू लागले. ह्या वाड्यास " पेशव्यांचा वाडा अथवा सरकारवाडा अर्से म्हणतात. ह्याचे बांधकाम, व चौथन्याचा गुळगुळीत व तोंड दिसण्या- इतका सफाईदार दगड, हे पाहण्यासारखें आहे; पेशव्यांनी गंगेवरील कोट, घाट व पटांगण ही बांधली आहेत; ह्या भागास "नवें नाशीक " असे म्हणतात. त्याचे " नाव दरवाजा "" दिल्ली दरवाजा मल्हार दरवाजा " वगैरे