पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०६ )

चालविली. ही हककित शाहस्तेखानास कळल्याबरोवर तो ताबडतोव नाशीक सोडून अहंमदनगरच्या बचावाकरिता तिकडे धांवून आला; व त्याच वेळी पंधराशे लोकांची एक टोळी त्यानें जुन्नर-शिवनेरी हस्तगत करून घेण्याकरितां तिकडे पाठविली; आणि इकडे शाइस्तेखानाची पाठ वळल्याबरोबर संभाजी


 ( २ ) कपालेश्वर हे शिवालय जुन्या तऱ्हेचें बांधलेले असून ते पुढे मोंगलांनी उद्ध्वस्त केल्यावर ६० सन १७२८ त कोळी राजानें बांधविले; व पुन्हां अलीकडेही त्याची दुरुस्ती करण्यांत आलेली आहे. या देवालयांत नंदी नाहीं, हे येथील एक मोठेंच वैशिष्य आहे.
 ( ३ ) रामेश्वर - हें शिवालय नारो शंकर दाणी राजेबहाद्दर मालेगांव- कर यांनी बांधिलें; या देवालयाच्या पुढील दरवजावरील दगडी चौकोनी जागेत, एक मोठी घंटा टांगलेली असून ती वसई येथून पोर्तुगीज लोकां- कडून आणिलेली आहे; ती इ. सन १७२१ मध्ये ओतलेली असून तिचा अवाज तीन मैलपर्यंत ऐकू जातो. या देवालयावर प्रशस्त गच्चा असून तेथें व घंटा टांगलेल्या ठिकाणी जाण्याला उत्तम जिने आहेत.

 गोदावरी नदीस नाशक येथें दुतर्फा घाट असून नदीच्या पात्रांत अनेक कुंडे आहेत; त्यांतील राम, लक्ष्मण, सीता, अद्दल्या वगैरे कुंडें प्रसिद्ध आहेत; नदीस, पात्रावरून जाण्यायेण्यास सांडवे ( लहान पूल ) बांधलेले आहेत; व दोन्ही बाजूस कांठावर सुंदर मंदिरें, वगैरे असल्यामुळे येथील देखावा मोठा आल्हादकारक व आनंददायक असतो; त्याप्रमाणेच तपोवनांतील दाट झाडी, देवालयें व नदीचा सुंदर देखावा ही असून सीता गुंफा, भुठे यांचें राममंदीर, वगैरे अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत; शिवाय, नाशीकच्या उत्तरेस चार मैलांवर म्हसरूळ येथे सिता सरोवर व डोंगरात जैनांचीं लेणीं, आणि मुंबई-आग्रा सडकेवर, नाशीकच्या पश्चिमेस सहा मैलांवर, तीन हजार फूट उंचीच्या डोंगरावर, पांडव लोणी, ह्रीं स्थळेही विशेष प्रसिद्ध असून प्रेक्षणीयही आहेत.
इतर विशेष ऐतिहासिक माहिती :--
(१) चांदोरी - हा जहागिरी गांव याच जिल्ह्यांतील निफाड तालुक्यांत