पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०७ )

अहंमदनगरकडून निसटून पुन्हां आपल्या पूर्वस्थानी संगमनेर येथे येऊन दाखल झाला; त्यामुळे मोंगल लोकांनी आतांपर्यंत केलेला सर्व खटाटोप व्यर्थ झाला.

 जुन्नरवर मोंगल सैन्य चाल करून येत आहे, असें पाहून जिजाबाई आपला नऊ वर्षांचा मुलगा शिवाजी यांस बरोबर घेऊन माहुलीच्या किल्लयाच्या आश्रयास गेली; त्यावेळीं जुन्नर येथे रहात असलेला नवा निजामशहा मूर्तुजा हाही तिजबरोबर तिकडे गेला; त्यानंतर मोंगल सैन्य जुन्नर येथे येऊन पोहोचलें; व त्यांनी जुन्नरचें ठाणे आपल्या ताब्यांत घेतलें. ही बातमी संगमनेर येथे संभाजीस समजतांच तो आपल्या कुटुंबांतील माणसें - आपली आई व भाऊ - व निजामशहा याच्या बचावा- करितां जुन्नर येथें ताबडतोब निघून आला; परंतु त्या पूर्वीच ही सर्व मंडळी तेथून निसटून माहुली येथे गेली असल्याचे त्यांस समजलें; संभाजी जुन्नर येथे येतांच मोंगलांनी तेथील ठाण्याबाहेर येऊन त्याच्याशी युद्ध केले; परंतु त्यांत बाल संभाजीनें मोगलांचाच पराभव करून त्यांना आपल्या ठाण्यांत परत पिटाळून लाविलें; व जुन्नर शहरास वेढा घालून त्यांचा कोंडमारा केला. ही हकीकत शाइस्तेखानास समजताच तो लागलीच जुन्नर येथें आला; ( मे,


गोदावरी नदीच्या कांठीं आहे; मराठ्यांचे दिल्ली येथील वकील हिंगणे, यांना हा गांव जहागीर आहे.

 कोटूरें- दादो ऊर्फ दाजी विठ्ठल बरवे नेवरेकर ( नेवरें छा गांव कोक- णांत रत्नागिरीच्या उत्तरेस दद्दा मैलांवर आहे.) यांची कन्या नामें राधा- बाई ही बाळाजी विश्वनाथ पेशव्यास दिली होती; दादोपंताचा मुलगा मल्हार- पंत ऊर्फ महादजी यांस, छत्रपति शाहू यानें छा गांव इ० सन १७१९. मध्ये जहागीर दिला; महादजीचा मुलगा अंताजी ऊर्फ बाबूराव बर्षे यांस बहिरोपंत पिंगळे याच्या भावाची मुलगी शाहूच्या विद्यमानें देण्यांत आली, व तेव्हां पासून देशस्थ व कोंकणस्थ यांचे विवाहसंबंध होऊं लागले. कोटूरें हें गांव नाशीक जिल्ह्यांत सिन्नर तालुक्यांत गोदावरी नदीच्या कांठी आहे.. बाबूराव बर्वे हा इ० सन १७४९ मध्ये कोठूरे येथे मृत्यू पावला.