पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०८)

इ० सन १६३६ ). संभाजीस वेदा उठविण्यास भाग पाडून त्या सैन्याची मुक्तता केली; संभाजीच्या सारखा पाठीवर राहून त्यास भीमा नदीच्यापलीकडे घालवून दिले आणि बरोबर तोफखाना नसल्यामुळेच शिवनेरीचा मजबूत किल्ला X हस्तगत करून घेण्याच्या भानगडीत न पडतो, जुन्नरच्या ठाण्याचा योग्य बंदोबस्त करून, तो शहाजहान बादशहाच्या भेटीकरितां दौलताबाद येथे निघून गेला.


 Xशिवनेरी उर्फ जुन्नरचा किल्ला, हा पुणे जिल्ह्यांत जुन्नरच्या पश्चिमेस सुमारें अर्ध्या मैलावर आहे. त्याची उंची एक हजार फूट, लांबी भजमार्से एक मैल, व आकार त्रिकोणाकृति आहे. किल्लयांत जाण्याची वाट जुन्नरच्या नैर्ऋत्य दिशेकडून आहे; व मार्गांत " बारा बावडी " या नांवाची एक मोठी विहीर आहे. तेथून थोडे पुढे सुमारे सहाशे कदमांवर एक मोठे वडाचें झाड आहे. तेथून किल्ल्याच्या चढावास प्रारंभ होतो; व तेथून जवळच पहिला दरवाजा अजमार्से ८०-९० पावलांवर; दुसरा म्हणजे "परवानगीचा दरवाजा" पुढें तित- • क्याच अंतरांवर; तिसरा म्हणजे "इत्ती दरवाजा" लागतो; येथून वीस पावलांवर चौथा दरवाजा आहे, व त्याच्याचजवळ एक पिराचें स्थान आहे; म्हणून त्यास "पिराचा दरवाजा " म्हणतात, येथून अजमासें अडीचशे कदमांवर पांचवा म्हणजे " शिवाई देवीचा " अथवा " शिवा बाईचा दरवाजा " म्हणून दर- वाजा आहे. हा दरवाजा मोठा भक्कम व भव्य असून त्याला अणीदार मोठ- मोठे लोखंडी खिळे मारिलेले आहेत. या दरवाजाच्या अंत डाव्या बाजूस कांहीं लेणीं व टांकी असून उजव्या बाजूस टँकडीवर जाण्याच्या रस्त्याशिवाय आणखी एक दरवाजा आहे; त्या रस्त्याने २९० याडीवर एक लहान कमा- नदार दरवाजा आहे, व त्याच्या आंत थोड्याशा पाय-यावर चढून गेलें म्हणजे त्या ठिकाणी शिवाई देवीचें देवालय आहे. हें देवालय एका भुयारावर बांधिलेले असून देवीच्या मागील बाजूस आहे; किल्लथांत हनुमान व गणपती या दोघांच्या मूर्ती असून " कमान टाँके, गंगाजमना टांके, मोती टांके, " वगैरे बावन टार्की आहेत; त्यांतील गंगाजमना या टाक्याचें पाणी फारच उत्तम आहे, व ह्या टाक्याच्या आंतून मोठमोठे दगडी खांब कोरिलेले