या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचा इतिहास.
भाग चौथा
क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत
शहाजी राजे.
परिच्छेद पहिला
भोसले घराण्याची पूर्वपीठिका.
तुझे मनोरथ सिद्धीस जातील; व तुझें वंशी
"श्री सांबाचा अवतार, शककर्ता निर्माण होईल. "
- तुळजापूर येथील देवीचा मालोजीस झालेला दृष्टांत.
भोसल्यांचे घराणें, हैं दक्षिणेंतील इतिहासप्रसिद्ध मराठा घराण्यांतील
"अतिशय प्रसिद्ध व पुरातन असून, हें क्षत्रिय घराणे देवराजजी महा-
राणा या नांवाच्या एका परराक्रमी रजपूत पुरुषानें दक्षिणेत स्थापन केले. यासंबंधी
अशी पूर्वपीठिका आहे की, अयोध्या प्रांतांत " शिसोदें " ह्या नांवाचे सूर्य-
वंशीय राजे राज्य करीत असतो त्यांच्यांतील एका पराक्रमी पुरुषानें नर्मदा
नदीच्या दक्षिणतीरीं येऊन त्या ठिकाणी एक राज्य संपादन केलें; व तेथें
तो स्वतंत्रपणें राज्य करूं लागला. पुढे शककर्ता शालिवाहन यानें त्याच्या