पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११३ )

स्वानजमान यानें शहाजीचा नाद सोडला; व तो उत्तर कोंकणांतील शहाजीच्या ताब्यांतील सर्व किल्ले आपल्या हस्तगत करून घेण्याच्या उद्योगास लागला. व माहुलीचा किल्ला हस्तगत करून घेण्याकरितां तिकडे वळला. तेव्हां त्या ठिकाणी शहाजीचें कुटुंब - जिजाबाई, बालशिवाजी व मूर्तुजाशहा ह्रीं रहात असल्यामुळे शहाजीस किल्ल्याच्या संरक्षणाकरितां तिकडे जाणे भाग पडले. त्याप्रमाणें शहाजी हा माहुली येथे येऊन पोहोंचला; तोच खानजमान तेथे येऊन दाखल झाला; तेव्हा शहाजी माहुली सोडून मनरंजनच्या किलशावर गेला. तेथेही सारख्या जोराच्या पावसांत चिखलांतून मोंगल फौंज दौडत आली; व तेथें उभयतांमध्ये एक लद्दानशी चकमक झडली; व मोगलांनी निजामशहाची छत्री, नौवत, पालखी वगैरे सामान व घोडे, उंट वगैरे जनावरें पकडली; तथापि शहाजी तेथून निसटला व पुन्हां माहुली येथे परत आला. त्याच्या पाठोपाठ खानजमानही त्या ठिकाणी येऊन दाखल झाला. त्यानें लागलीच किलपास वेढा दिला; मोर्चे बांधिले; व किल्ला हस्तगत करून घेण्याचा मोठ्या निकरानें उद्योग आरंभिला.

 इकडे शहाजीनें माहुलीच्या किल्लयांत आल्यावर, खानजमान येऊन पोहोचण्याच्यापूर्वीच किल्ला लढविण्याची तयारी केली होती; व त्याप्रमाणें त्यानें कांहीं दिवसपर्यंत मोंगल व विजापूरकरांच्या एकवटलेल्या सैन्यास दाद न देता मोठ्या मर्दुमकीनें किल्ला लढविलाही, परंतु अखेरीस किल्लयाच्या माचीलगत धान्याची कोठारें होतीं, तीं मोगलांनी लुटिलीं; त्यामुळे उपासमार होण्याचा प्रसंग येऊन शहाजीचा सर्वस्वी नाइलाज झाला. यावेळी शहाजीचा पुरस्कर्ता विजापूरकर सरदार रणदुल्लाखान हा खानजमानबरोबर युद्ध भूमी- वर असून, तो मोंगलाशी तह करण्याबद्दल शहाजीस सारखा आग्रह करीत होता. अखेरीस याच्याच मार्फत शहाजीनें खानजमानार्शी तहाचें बोलणें सुरू केले; परंतु नवा सुलतान मूर्तुजा निजामशहा, व सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, शिवनेरी, व त्रिंबक या सहा किल्लयांच्या सोडचिठ्ठधा, शहाजीनें पहिल्यानें आपल्या स्वाधीन केल्याशिवाय खानजमान हा त्यास तिळमात्रही सवलत देण्यास तयार नव्हता; त्यामुळे अखेरीस मूर्तुजा निजामशहा, व उपरी