पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११७ )

नवरा मोहिमेवर असतांना त्याच्या बरोबर तिनें लढाया पाहिल्या होत्या, व बरोबर नसल्या वेळी न्यायमनसुची केलेली होती. अशा ह्या कर्त्या व पोक बाईच्या हवाली पुण्याकडील जगाहीर करून, दादाजी व सोनोपंत या वृद्ध मुत्सद्यांच्या सल्ल्याने शिवाजीचें व जहागिरीचें पालनपोषण करण्यास ह्या बाईस शहाजीनें आपला प्रतिनिधी नेमिले, व निर्धास्त अंतःकारणानें विजा- पूरचा रस्ता धरिला. शिवाजीचे वय ह्या वेळी नऊ वर्षांचे असून जिजाबाई व शहाजी यांच्या बरोबर दौलताबादेपासून माहुलीपर्यंतच्या स्थळी त्या त्या कालीं तो होता ” ( रा. मा. वि. चंपू राजवाडे; ). शहाजीनें दादोजी कोंड- देव या नांवाच्या एका हुषार, विश्वासू, इमानी, व वृद्ध मुत्सद्यास आपल्या पुण्याकडील जद्दागिरीचा कारभारी नेमिले, तेव्हांच सिद्दी हिलाल या नांवाच्या एका मनुष्याची त्यानें दादोजीच्या हाताखाली नेमणूक केली; त्याच्या दिमतीत एक हजार स्वार देऊन, त्याच्यावर तेथील बंदोबस्ताची काम• गिरी सोपविली; त्याप्रमाणेच कर्नाटक प्रांतांत नारोपंत हणमंते याच्या मदतीन त्याने तिकडील प्रांताची सुव्यवस्था करण्याचा उद्योग आरंभिला, व त्यांत तो यशस्वी होऊन त्यानें लवकरच तिकडील प्रदेश भरभराटीस आणिला.