पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिच्छेद तिसरा.
शहाजीचें उत्तर चरित्र

 शहाजी राजे यांची (बेदनूरकर भद्राप्पा नाईक याच्या- बरोबरील युद्धांत) फत्ते झाल्यामुळे, तेथून कूच करून दुसरी ठाणीं बखेडदार होतीं, त्यांचा बंदोबस्त करावा, म्हणून तुंग- भद्रातीरों बेदिकरें उर्फ बसवपट्टण येथे आले; तेथें अनेक श्वापदें उत्पन्न झाली. राजांस (शहाजीस) शिकार करावयाची इच्छा होऊन हरणाचे पाठीस लागले. ईश्वरईच्छा, त्या योगें घोड्याचा पाय भंडोळीत अडकून घोडा, व राजे एकावच्छे पडले ते गतः- प्राण झाले. मागाहून लोक माणसें आली; त्यांनी व्यंकोजी राजांस तेथे आणविलें. व्यंकोजी राजे यांनी उत्तर क्रिया सांग केली. आदिलशहाकडून दुखवटा येऊन मनसबदारीची वस्त्रे व्यंको- जीच्या नांवे झाली. शिवाजीस वृत्त कळून जिजाबाईसुद्धां शोक- समुद्रीं पडन बहुत विलाप केला. शहाजी राजे तुंगभद्रातीरीं त्या जाग्यास छत्नी इमारत मजबूद करविली, आणि पादशाही सनद घेऊन बेदिकरें गांव तेथील खर्चास लावून दिला, तो गांव छत्रीकडे अद्याप चालत आहे. "

शहाजीचा मृत्यू शके १६८५;
माघ शुद्ध षष्ठो, शनीवार;
( ज्यानेवारी इ० सन १६६४. )


 शहाजी कर्नाटक प्रांतांत गेल्यानंतर, इ० सन १६३८ पासून इ०सन १६४७ अखेरपर्यंतच्या दहा वर्षात त्यानें त्या प्रांतांतील अनेक बंडखोर सर-