पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२० )


इ० सन १६३८ पासून इ० सन १६४७ अखेरपर्यंतच्या दहा वर्षांत त्यानें अनेक युद्धपराक्रम करून व त्या प्रांतांत अदिलशाहाची सत्ता पूर्णपणें प्रस्थापित करून, उत्तम प्रकारची राज्यव्यवस्था केली; परंतु या दहा वर्षांत त्यानें जे अनेक युद्धपराक्रम केले व जी राज्यव्यवस्था केली, तिचा संपूर्ण वृत्तांत उपलब्ध होत नाहीं; तथापि तंजावरच्या शिलालेखावरून असे कळून येतें कीं, या अवर्धीत त्यानें विधुपुरचा राजा वीरभद्र, श्रीरंगपट्टणचा राजा कंठीरव, कोंगदेशचा राजा कोंगनायक, कावेरीपट्टणचा राजा जगदेव, तंजावर ऊर्फ तंजापूरचा राजा विजयराघव, चंदांचा राजा व्यंकटनायक, मदु- रेचा राजा तिरुमलनायक, वली गुंडापूरचा राजा अरिकाल वेंकटनायक, विज यानगरचा राजा रंगशायोनायक, इसकुटपुरचा राजा तन्नोगोड ऊर्फ तम्मागोड नायक, वगैरे बलिष्ठ पाळेगारांना जिंकून त्यांच्याकडून खंडण्या घेतल्या;


 ÷ या बाबतीत “ राधामाधव विलासचंपू " मध्ये खालीलप्रमाणे थोडीशी निराळी हकीकत दिली आहे; ती अशी कीं:--शक १५५९ साल चैत्रवेशा- खांत शहाजी विजापुरी दाखल झाला. व याच वर्षाच्या पावसाळ्यानंतर त्याची रवानगी रणदुल्लाखानाबरोबर कर्नाटकांत म्हणजे सध्याच्या म्हैसूर प्रांतांत झाली. तेथील कित्येक पाळेगारांनीं व राजांनी दक्षिणचा सुभा जो अठरा वर्षांचा औरंगझेब त्याच्याशी संविधान बांधून आदिलशहाच्या दपटशां- तून मुक्त होण्याची खटपट चालविली होती. त्यांना ताळ्यावर आणण्याकरितां आदिलशहास त्या प्रांतीं सैन्य पाठविणे इष्ट दिसले. रणदुल्लाखान हा वरिष्ठ सरदार, सचब लढण्याचा वगैरे सर्व भार शहाजीवर सहजच पडला. रायगिरी येथील राजा वीरभद्र यांजकडून खंडणीचा पैसा थकला, करतो त्याचा समा चार ह्या वर्षी व शक १५६० च्या प्रारंभी घेऊन रणदुल्ला व शहाजी विजा- पुरास परत आले. शक १५६१ प्रमाथी संवत्सरांतील दुसऱ्या वर्षीच्या मोहि मेंत शहाजीने बसवापट्टण सर केले; त्या वर्षी मोहीम करून विश्रांतीस परत आल्यावर कनकगिरीच्या सनदा महंमदाशदानें खुष होऊन शहाजीस बहाल केल्या. १५६२ साली शहाजी राजास नूतन अर्जानी झालेल्या कनकगिरीच्या जहा गिरांतील गिराशांनी बंड केलें. जवळच्याच एका तालुक्यांत शहाजी मोहिमे-