पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२७)

पहात होता, त्याच्यावर तो चाल करून गेला; इतक्यांत सिद्दी रैहान यानें दामलवाड याच्या पिछाडीवर हल्ला करून त्यास ठार केले. त्यामुळे हिंमत खचून बेदनूरकरांचे सैन्य त्या ठिकाणाहून आपला जीव घेऊन पळालें, व अदिलशाही सैन्यास विजय प्राप्त झाला.

 तथापि ह्या विजयाचें यश कोणी मिळविलें, हा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धास सुर वात झाल्यावर या युद्धाचा सर्व भार प्रारंभी शहाजी व आसदखान या उभय- तांच्या सैन्यावर पडला, व त्यांत जरी आसदखान जखमी झाला तरी त्याब रोबरच त्या उभयतांच्या सैन्याशी झगडण्यांत दामलवाड याची बहुतेक सर्व शक्ति खर्च होऊन गेली, व त्यामुळेच सिद्दी रैहन याला दामलवाडावर जय मिळविता आला. अशी स्थिति असल्यामुळे शहाजी व आसदखान यांच्या पक्षांतील मंडळी आपण जय मिळविला, असें म्हणूं लागली, व सिद्दी रैहन हा तो मान आपला आहे, असे म्हणूं लागला; अखेरीस हा वाद निवाड्या- करितां मुस्तफाखानापुढे आला; परंतु त्यानें स्वतःच सर्व युद्धचमत्कार अव लोकन केलेला असल्यामुळे कोणत्याही एका पक्षाची त्याला तरफदारी करतां आली नाहीं; त्यामुळे अखेरीस दोन्हीही पक्ष नाखुष झाले. त्यामुळे सिद्दी रेहन व मुस्तफाखान यांचे वाकडे पडले; त्यामुळे, शहाजी अंतस्थरोत्या बेद- नूरकराला सामील आहे, हा मुस्तफाखानाचा संशय दृढ झाला; शहाजीनें ह्या एकंदर मोहिमेंत अंगचोरपणा केला, बेदनूरकरांचा जितका पक्का बंदो- बस्त करावयास पाहिजे होता, तितका केला नाहीं, असें मुस्तफ खानास चाटले. त्यामुळे शहाजी व मुस्तफाखान यांच्यांत पूर्वीपासूनच वैमनस्य होतें, ते अधिक दुणावलें; मुस्तफाखानाने शहाजीच्या हालचालीवर नजर ठेवण्या- करती आपल्या हाताखालील सरदारांस हुकूम केला व त्यानंतर लवकरच ( इ. सन १६४८ ) मुस्तफाखान हा शिद्दी रहानसह जिंजी ऊर्फ चंदांकडे व शहाजी हा आपल्या जहागिरीत जाऊन राहिला.

 परंतु याच वेळेपासून शहाजी व मुस्तफाखान या उभयतांमधील वैमनस्य परमावधीस पोचलें; शहाजी मुस्तफाखानाचे हुकूम मानीनासा झाला; मुखत्या रीने वागू लागला; मुस्तफाखानानें “शहाजी आपला म्हणजे अदिलशहाचा हुकूम मानीत नाहीं; " अशी महंमद अदिलशहाकडे तक्रार केली; महमंदशहा हा