पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

स्वरूपाची कीर्ति दिल्लीचा बादशादा अल्लाउद्दीन खिलजी ( कारकीर्द इ. स. १२९६ ते इ. स. १३१६ ) याच्या कानावर गेली; तेव्हां त्याने तिच्या अभिलाषानें मेवाड प्रांतावर स्वारी केली आणि त्यानंतर रजपूत व मुसल मान यांच्यामध्ये भयंकर रणकंदन माजून अल्लाउद्दीन यानें अखेरीस चितोड. गड आपल्या हस्तगत करून घेतला ( इ. स. १३०४). त्यावेळी आपल्या चंशाचा समूळ नाश नाश होऊं नये म्हणून लक्ष्मणसिंहानें आपला दुसरा व सर्वांत आवडता मुलगा अजयसिंह यांस आपणाजवळ बोलावून घेतलें; व त्यास आज्ञा केली कीं, आपल्या घराण्याचे निर्मूलन होणे कोणत्याहि प्रकारें इष्ट नाहीं; म्हणून तूं ताबडतोब या ठिकाणाहून निघून केलवाडा "या नांवाच्या अवघड व बळकट ठिकाणी जाऊन आपल्या प्राणाचे रक्षण करावेस; " अल्लाउद्दीनच्या सैन्याबरोबर आपण दोन हात करावे, अशी अजयसिंहाची फार इच्छा होती; त्यामुळे स्वतःच्या प्राणाचे रक्षण करण्या- करितां पळून जाणे त्यास पसंत नव्हतें; तथापि वडिलांनीं फारच आग्रह केल्यामुळे तो अखेरीस नाइलाजानें आपल्या वडील बंधूचा अज्ञान मुलगा हमीरसिंह ऊर्फ हम्मीरसिंह यांस बरोबर घेऊन कैलवाडा येथे गेला, व इकडे रजपुतांचा भयंकर प्राणनाश होऊन चितोडगडावर मुसलमानी अंमल सुरू झाला.

 अजयसिंह हा हमीरसिंहास बरोबर घेऊन कैलवाडा येथे गेल्यानंतर त्यानें त्या ठिकाणी एक बरेंच मोठे सैन्य जमविलें; आणि मुसलमानांच्या ताब्यांत गेलेल्या आपल्या वडिलांच्या राज्यापैकींचा बराच प्रदेश त्याने पुन्ह


 कैलवाडा, हा खेडेगांव उदेपूरच्या राज्यांत पश्चिम सरहद्दीवर, अर- वली पर्वताच्या आंतील भागांत कुमलगड या नांवाच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला आहे. हा किल्ला महाराणा कुंभ यानें पंधराव्या शतकांत बांधिला असून तो अतिशय मजबूत, चढण्यास अवघड व समुद्रसपाटी- पासून अजमार्से ३५६८ फूट उंचीवर आहे.