पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२९ )

महंमद आदिलशाच्या बाबतीतही घडून आला; शिवाजीनें उडविलेल्या एकंदर धुमाकुळाची बातमी आदिलशहास कळल्यावर त्यानें शिवाजीस आवरण्याबद्दल शहाजीस धमकी दिली; “तुम्ही पादशाही चाकर, आणि शिवाजी (तुमचा ) लॅक पुण्याकडे पाठवून यांणी पादशाहाशीं बदलून हरामखोरी केली. चार किल्ले पादशाही घेतले. देश मुलूख काबीज केला, व मारिला. एक दोन राज्ये बुडविलीं, व एक दोन राजे पातशाही रुजुवात (बादशाहाशीं राजनिष्ठ) होते ते मारिले, आतां लेकास कैदवार ठेवणें ( आतां शिवाजीस आपल्या ताब्यांत ठेवावें) नाहींतर पादशाही इवाला घेतील. " असें शहाजीस धमकीवजा पत्र पाठविलें त्यावर शहाजीनें आदिलशहास असें स्पष्ट कळविले की, " शिवाजी आपला पुत्र परंतु आपणाजवळून पळोन गेला; तो आपल्या हुकुमांत नाहीं. आपण तो पादशाहाशीं रुजवात एकनिष्ठेने आहों. शिवाजी आपला पुत्र, याजवरी हल्ला करावी. मन मानेल तें करावें. आपण दरम्यान येत नाही. " परंतु शहाजीच्या ह्या उत्तरानें अदिलशहाचें बिलकुल समाधान झालें नाहीं; शिवाय " शिवाजीच्या बंडाळीस शहाजीच कारणीभूत आहे, त्याचीच शिवाजीस गुप्त रीतीनें फूस, मदत व उत्तेजन आहे, आणि खुद्द शहाजी- चाही स्वतंत्र राज्य स्थापना करण्याचा मनापासून उद्योग सुरू आहे अशा- बद्दल अदिलशद्दास स्वतंत्र पुरावा मिळाला; + त्यामुळे तर शहाजीची या


 + ह्या बाबतीत म्हैसूरच्या इतिहासांत (Wilke's Mysore; Vob. I पहा.) असा उल्लेख केलेला आहे कीं, जेव्हां आदिलशाही सैन्यास शिवाजी मोजीनासा झाला व बादशाही सत्तेसही त्यानें धाब्यावर बसविले, त्याच वेळी लागलीच "शिवाजीचे हैं अनियंत्रित वर्तन ताबडतोब बंद करावें" अशी अदिल- शहाने शहाजीस ताकीद दिली. त्याच वेळी विजापूर दरबारांतील कित्येक लोक तर उघड उघड असेंही बोलू लागले की, शिवाजीच्या ह्या सर्व वर्त- नास अंतस्थरीत्या शहाजीचीच फूस आहे. तथापि शहाजीनें कानावर हात ठेवून अदिलशहास असे कळविलें कीं, " मी दुसरे लग्न करण्यापूर्वीच माझी पहिली बायको व हा मुलगा ( शिवाजी ) यांच्याबरोबरील धर्मशास्त्रानुरूप