पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३१ )

खान, आसदखान, मसूदखान, अज्जमखान, सर्जाखान, या दुइग्वान, अंबारखान, "जोहारखान, बाळाजी हैबतराव, राघोजीराव, बाजीराव घोरपडे, यशवंतराव, कन्नोळ राजा, वेदाजी भास्कर अणकर वगैरे हिंदु मुसलमान सरदार त्याच्या छावणीत इजर होते. मुस्तफाखानास शहाजास कैद करण्याबद्दलचा शहाचा हुकूम मिळाल्यावर त्याने शहाजीस निरोप पाठविला की, पुढील वर्षाच्या मोहि- मेच्या कार्याची आंखणी व योजना ठरवावयाची आहे, तेव्हा आप ल्यासारख्या धुरंधराची सल्ला घेतल्यावांचून कोणताही कार्यक्रम निश्चित करणे योग्य होणार नाहीं; सबब आपण सत्वर निघून आमच्या छावणीत - यावें. " मुस्तफा खानाच्या ह्या निरोपांत कांहीं तरी कपट असावे, असे -शहाजीनें लागलीच ताडले; तथापि बाह्यात्कारी तसे कांही एक न दाख- वितां त्याने खानाचे आमंत्रण स्वीकारून त्याच्या मुक्कामावर चंदांकडे जाण्याची तयारी केली; आपला मुलगा संभाजी याच्या ताब्यांत बंगलूरचा केला व तेथील फौज देऊन त्यास कांही कमजास्त झाल्यास तयारीत अस व्याविषयों बजावलें, आणि खडाजी, मानाजी माने, तानाजी, बंधूजी, दसोजी, मेघोजी, व भांडवलकर या सात इमानी सरदारांना आपणाबरोबर घेऊन तीन हजार सैन्यासह तो मुस्तफाखानाच्या भेटीस गेला. खानानें चरागी मोठी अदब दाखवून त्याची भेट घेतली, त्याला निरनिराळ्या सबबी सांगून आपणाजवळ ठेवून घेतलें; नंतर एके दिवशी पहाटेस शहाजी हा तंबूत निजला असतां आसदखान, यशवंतराव, व बाजी घोरपडे, यांनी त्या तंबूला वेढा दिला; त्याचा गलबला एंकून शहाजी जागा झाला, व घोड्यावर बसून निसटून जाणार इतक्यांत बाजी घोरपड्यानें त्याचे पाय धरून त्यास पकडलें; X इतक्यांत ही हकीकत शहाजीच्या सरदारांना व


बेल रोटीवर हात ठेवून घेतली. " ( भा. इ. सं. मंडळ चतुर्थ संमेलनवृत्त; पान १७९-१८० पहा.). यावरून शिवाजीनें निराळे राहून स्वतंत्र राज्य "मिळवावें अशाबद्दल शहाजीचा गुप्त प्रयत्न होता है उघड होतें.

 x शहाजीस बाजी घोरपड्यानें कसा पकडला याबद्दल निरनिराळ्या ठिकाण निरनिराळे उल्लेख आढळतात; शहाजी व बाजी घोरपडे या उभ