पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३३)

शहाजी बिजापूर येथें येऊन पोचल्यानंतर अदिलशहाने त्यास फर्माविलें कीं, " तुमच्या मुलानें बंडाळी माजविली असून त्यांत तुमचेंही अंग आहे; तरी त्याचा बंदोबस्त तुम्ही ताबडतोब करावा. " त्यावर शहाजीनें अदिल- शहास विनंती केली की, " मुलगा आमच्या काह्यांत नाहीं. मी माझ्या


तंजावरकडे जाण्याची परवानगी मिळावी." परंतु, "तुमच्या जाण्यानें वेढ्याच्या कार्यात व्यत्यय येईल " असे खानानें शहाजीस सांगून त्यास परत जाण्यास परवानगी दिली नाहीं; त्यावर शहाजीनें खानास उलट असें कळविले की, “ छावणीत धारण अतीशय महाग झाली आहे; त्यामुळे माझ्या सैन्याची उपासमार होत आहे; व ही उपासमार, व हे युद्धाचे कष्ट यापुढे सोशीत राहण्यास माझें सैन्य अगदीच असमर्थ आहे; आणि अशा स्थितींत आपण मला जाण्याची परवानगी दिली नाहीं तरी मी जाणार, हे निश्चित आहे. " तेव्हां शहाजीच्या मनांत दगा आहे व तो आपणार्शी युद्ध करील अशी खानाची खात्री झाली. त्याने शहाजीस मोठ्या युक्तीनें पकडलें; व त्याची सर्व मालमिळकत सरकारांत जप्त केली.

 वरील महमुदनाभ्यांत दिलेल्या हकीकतीविषयी अधीक माहिती बसातीन- ई-सलातीन या अतीशय विश्वसनीय तवारिखीत दिलेली आहे. ती अशी कीं:-शहाजीनें मुस्तफाखानाच्या हुकुमाचा अनादर करून तो खानाचा प्रतिकार करूं लागला तेव्हां खानानें त्यास कैद करण्याचे ठरविलें; व एक दिवस बाजी घोरपडे व यशवंतराव आसदखानी या उभयतांना अगदर्दी पहाटेसच आपल्या सैन्यासह शहाजीच्या तळावर त्यास कैद करण्याकरितां पाठविलें; त्या वेळी शहाजी निजलेला होता; परंतु हे उभयतां सरदार तेथे आल्यावर शहाजीस जागे करून त्यास ही हकीकत सांगन्यांत आली; तेव्हा आपणा- चर है। अचानक घाला भाला असे पाहून, घाबरून, शहाजी जिवाच्या भीतीनें एकटाच घोड्यावर स्वार होऊन पळाला; तेव्हां बाजी घोरपडे यानें त्याचा पाठलाग करून त्यास पकडून मुस्तफाखानासमोर आणून उभें केलें; व खानानें त्यास प्रतिबंधांत ठेविलें. त्याचें तीन हजार सैन्य उधळून लाविलें व त्याचा सर्व तळ लुटला. ही हकीकत आदिलशहास कळल्यावर त्यानें