पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३४ )

पहिल्या बायकोचा व तिच्या ह्या मुलाचा ( शिवाजीचा ) कर्धीच त्याम करून दुसरे लग्न केलें आहे; त्यामुळे त्यांचा आमचा आज पुष्कळ वर्षे कोण- त्याही प्रकारचा तिळमात्रही संबंध नाही. तो सरकारचा गुन्हेगार असल्याने त्याचा आपणांस योग्य वाटेल त्याप्रमाणें बंदोबस्त करावा. आपण आड येत नाहीं. " त्यानंतर शहाजीस देहांत शासन करावें की काय, याबद्दल दर- बारांत बरीच वाटाघाट होऊन शद्दाजीचा प्राणनाश न करितां, “ शहाजीनें जर अमूक दिवसांत शिवाजीचा बंदोबस्त केला नाहीं, व शिवाजी आम्हास शरण येईल अशी व्यवस्था केली नाही तर त्यास भिंतींत चिणून ठार मार- ण्यांत येईल " अशी धमकी देण्यांत आली. भिंतींत दगडाचा एक कोनाडा करून त्यांत बसण्यापुरती जागा ठेवून, तींत शहाजीस बसवून एक चिरा मात्र लावावयाचा बाकी ठेवण्यात आला. या कोनाड्यांतून दिवसांतून एक दोन वेळां बाहेर काढून, शहाजीस थोडा वेळ उघडी हवा मिळाल्यावर पुन्हां त्या कोनाड्यांत ठेवावयाचें, असा नित्यक्रम सुरू झाला; आणि या अत्यंत खडतर, कष्टदायक व दुर्धर स्थितीतच त्याला आपल्या आयुष्याचा पुडील कांहीं काळ कंठीत राहणें प्राप्त झालें.

 शहाजी वरील या प्राणांत प्रसंगाची बातमी संभाजी व शिवाजी या उभयतांना मिळाल्याबरोबर त्यांनी दोन्हीकडून अदिलशहास जोराचा शह देण्याला सुरुवात केली; संभाजीनें आपला सर्व फौजफाटा व जंगी तोफखाना


शहाजीस विजापूर येथे आणण्याकरितां, आपला सरदार अफझलखान यांस रवाना केले; व त्याची सर्व मालमिळकत जप्त करण्याकरितां एका खोज्याचीही त्याच्याच बरोबर रवानगी केली; ( इ० सन १६४८ नोव्हेंबर ). त्यानंतर अफझलखानानें शद्दाजीस बेड्या घातलेल्या स्थितीत विजापूर येथें आणिलें.

 यावरून शहाजीस पकडण्यास जरी बाजी घोरपडे व यशवंतराव आसद- खानी हे दोन सरदार त्याच्या तळावर गेले होते तरी फक्त बाजी घोर- पडघानेच शहाजांचा पाठलाग करून पकडलें, म्हणजे बाजी घोरपडथानेक शहाजीवर हा प्रसंग आणिला, व शहाजी दग्यानेंच पकडला गेला, ह्या गोधे उघड होतात.