पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३८)

विषयही त्याने तात्काळ आदिलशहास पत्र पाठविले. त्यावेळी दक्षिण प्रांताचा सुभेदार शहाजादा मुरदबच याच्याकडून शहाजी व शिवाजी या उभयतांना ता० ३० नोव्हेंबर इ० सन १६४९ ची दोन निरनिराळी पत्रे आलीं; त्यापैकी शहाजीस पाठविलेले पत्र ( राजवाडे, म. इ. सा. खंड ८ लेखांक ३ पहा.) खाली लिहिल्याप्रमाणे आहे तें:-

 "उमरावी सरदारीच्या योग्यतेचे, शूर, पराक्रमी, दौलतीचे उत्तम अभीष्टचिंतक, राजनिष्ठ शिरोमणी, महत्कृपेस पात्र, शहाजी भोंसले यांणी बादशाही कृपेस आपला सत्कार जाणोन समजावें की, तुमचें पुत्र शिवाजी याण अर्जदास्त हुजूर येण्याविशीं पाठविली, ती पाहून कृपेसकारण जाले. पेशजीच्या गोष्टी मनांत न आणितां निजामशाही जगविण्याच्या प्रयत्नांत मोंगली सैन्याशी शहाजीनें जे युद्धप्रसंग केले, ते मनांत न आणितां-तुमची मोकळीक करण्याविषयी लिहिले आहे. त्यास हल्ली आम्ही दिल्लीकडे जात आहों तुम्हांस खुत्र खबर देतो की, तुम्ही सर्व प्रकारें खातरजमा ठेवावी, जे, आम्ही हुजूर पावलियावरी-म्हणजे आम्ही दिल्ली येथे जाऊन शहाजहान बादशहाची भेट घेतल्यावर तुमचे मजकुराविषयी अर्ज करून बंदोबस्त करून देऊं. परंतु तुम्ही आपला एक वकील इतवारी (विश्वासू ) द्यावा; म्हणजे त्यास नागमें फमान कौलाचें, चिरंजीव संभाजी वगैरे सरकार कृपेस पात्र होऊन पेशजीप्रमाणे मनसचा व नूनन सरफराज पावतील, इकडील स्नेहांत व इकडील लक्षांत वागणे हे सर्व आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यास कारण आहे. म्हणोन तसे वागोन खातरजमा ठेवावी. आणि तुम्हाकरितां पोषाख पाठविला हा घेऊन आपणांवर पूर्ण लोभ आहे, असे मनात आणावें. छ ५ माहे जिल्हेज, सन २३ जुलूस, सन १०५९ हिजरी. "

 बादशहा शहाजहान यांजकडून, शहाजीस सोडून देण्याविषयों अदिल- शहास हुकूमवजा पत्र आल्यानंतर, शहाजीस अपाय करण्याची अथवा त्या पत्ताचा अनादर करण्याची त्यास हिंमत झाली नाहीं; बादशाही पत्राचा अहेर करण्याची महंमद अदिलशहास छाती झाली नाहीं. शिवाजीनें दिलेला शहाजहानचा शह असा जोरदार व बलवान् होता कीं, त्याला शहाजीस घड सोडिताही येईना, अथवा त्याला प्रतिबंधांत ठेवून मोंगल