पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)

आपल्या हस्तगत करून घेतला; व राजनगर* या नांवाचा एक किल्ला बांधून तेथें आपली राजगादी स्थापन केली. अजयसिंहाचें आपल्या पुतण्यावर अतीशय प्रेम होतें; त्यामुळे तो वयत आल्यावर अजयसिंहानें त्यास- हम्मीर सिंहास- गादीवर बसविलें; व आपण सर्व राज्याचा कारभार पाहू लागला. अशा रीतीने कांहीं काळ लोटल्यावर अजयसिंह मृत्यु पावला. त्याल सज्जन- सिंह या नांवाचा एक मोठा शूर, कर्तृत्ववान व विचारी मुलगा होता; त्यानें, आपल्या चुलत भावार्शी राज्याकरितां भांडत बसण्यापेक्षा आपण स्वतःच एक स्वतंत्र राजगादी स्थापन करावी, असा विचार करून तो दक्षिणेकडे आला; आणि सौंधवाडा प्रांत काबीज करून तेथें त्याने एका स्वतंत्र राज्याची स्थापना केली.

 या ठिकाणी त्याच्या घराण्याचें चार पिढघा वास्तव्य झालें; सजनसिंहा नंतर दिलीपसिंहजी, सिंहजी ऊर्फ शिवाजी, भोंसाजी+ व देवराजजी है चार पुरुष अनुक्रमे राज्यकर्ते झाले. या चारीही राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत मुख- लमान लोकांनी त्यांच्यावर अनेक वेळां स्वाच्या केल्या. त्यामुळे त्यांना अतीशय नास भोगावा लागला. अखेरीस देवराजजी हा इ० सन १४१५ च्या सुमा रास राज्यत्याग करून नर्मदा ओलांडून प्रथम दक्षिणेत आला; व आपले नांव बदलून आपणास " भोसावंत भोंसले " असे म्हणवून घेऊं लागला. त्याने पहिल्यानें कांहीं दिवस कृष्णा व भिमा या नद्यांच्या तीरों पाळेगिरी करून आपला चरितार्थ चालविला; व नंतर सिंगणापूरची पाटिलकी मिळविली, व तो तेथें कायमचे वास्तव्य करून राहूं लागला. याच वेळेपासून सिंगणापूर है भोसल्यांचे मूळ गांव असे मानितात.


  • राजनगर हा किल्ला व गांव उदेपूरच्या राज्यांत उदेपूरपासून अज

मार्से चाळीस मैलांवर, उत्तर दिशेस आहे.

 +भोंसाजी हा चितोडनजीक भोसावंत म्हणून एक गांव आहे, तेथे येऊन राहिला होता, त्यावरून, – अथवा “भोसाजी" या नांवाच्या पुरुषावरून त्या वंशास “भोंसले" हें नामाभिधान प्राप्त झालें, असाहा उल्लेख आढळतो.