पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४० )

( इ० सन १६४९). त्या वेळीं अदिलशहाने त्यास तीन अटी घातल्या त्या: - ( १ ) संमाजी अदिलशाही प्रदेशांत पुन्हां घामधूम करणार नाहीं, अशी तजवीज करावी. ( २ ) शिवाजीनें ह्या वेळेपर्यंत जो अदिलशाही प्रदेश हस्तगत करून घेतला असेल तो त्याच्याकडून आम्हांस परत देव- चावा; व ( ३ ) चित्रकलकर नायक बच्चकती भरमा याचा पूर्णपणे बंदोबस्त करावा. यांपैकी पहिलें व तिसरें कलम शहाजीनें मान्य केले; व दुसऱ्या कलमासंबंध पूर्वीप्रमाणेच ह्या वेळींही त्यानें शहास असे स्पष्ट सांगितलें की, " शिवाजी हा माझ्या कह्यांत नाहीं, व तो माझे ऐकेल किंवा न ऐकेल याचीही मला खात्री देता येत नाहीं. " अर्थात दुसऱ्या कलमासंबंधानें जिम्मा घेण्याचे शहाजीनें पतकरलें नाहीं; तथापि महंमदशहानें या बाबतीत शिवा- जीशी शिष्टाई करून खटपट करण्याची कामगिरी पुढे शहाजीवर लादलीच; नंतर शहाजी कर्नाटकमध्ये परत गेला; त्यानें संभाजीस लागलींच थोपवून घरिलें, व चित्रकलकर भरमा यांस नामशेष करण्याच्या उद्योगास त्यानें लागलीच प्रारंभ केला.

 शहाजी हा या प्राणसंकटांतून मुक्त होऊन कर्नाटकप्रांती सुरक्षित पोहों- चला, हे ऐकून शिवाजीस अत्यानंद झाला; परंतु अदिलशहानें घातलेल्या तीन अटींपैकी पहिले कलम शहाजीनें मान्य करून व दुसऱ्या कलमाच्या बाबतींत शिष्टाई करण्याचे मान्य करून म्हणजे या दोन मानहानीकारक अटी पत्करून शहाजाने आपली मुक्तता करून घेतली, याबद्दल शिवाजीस फार वाईट वाटले; आणि वास्तविक पाहता संभाजीने फरादखानाचा पराभव करून व आपण मुसेखान, फत्तेखान व बल्लाळ बेडर यांना धुळीस मिळवून, व अदिलशहाला, शिवाय मोंगल बादशहाकडूनही शह देववून शहाजीच्या मुक्ततेसंबंधाची तजवीज केली असूनही महंमद अदिलशहाच्या उपरीनिर्दिष्ट


पर्यंत अजमायें चार वर्षे होता; त्यानंतर इ० सन १६५३च्या प्रारंभी आदिल- शहानें त्यास कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी दिली, व शहाजीची सुटका महंमदशहानें सन १६४९ मध्ये, (शक १५७१ जेष्ठ शुद्ध पौर्णिमा) विजापूर - येथें न करतां कोंडाणा ऊर्फ सिंहगड येथे आणून केली, असाही उल्लेख आढळतो.