पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४५)

शिक्यांतले शब्द गंभीरार्य पूर्ण आहेतच; पण इतर प्रकारामुळेसुद्धां हा शिक्का चमत्कारिक आहे. शिकांत देवाचें तरी नांव असावें, नाहीतर राज। चें तरी असावे. येथें दोन्हीं नाहींत ! दुसरी गोष्ट अशी की, बापाच्या हयातीत निराळा अधिकार मिळाला असल्याखेरीज मुलानें निराळा शिक्षा करण्याचें प्रयोजनच नाहीं. बापाच्या शिकथावरच मुलानें सरकारी काम भागवावयाचें असतें. शहाजीपेक्षां शिवाजीला निराळा अधिकार कोणता चालवावयाचा होता? असला हा स्फूर्तिजनक चमत्कारिक शिक्षा कल्पून तो सरकारी कागदपत्रांवर करण्याची कल्पना, दहा वर्षांच्या मुलाला आपण होऊनच सुचली, असें तर कोणाचे म्हणणें नाहीं ना ? हा नवीन शिका शिवाजी करीत असतो, व त्याचे कारकून स्वतःस पेशवे, मुजुमदार, डबीर, म्हणवीत असतात, ही गोष्ट शहाजीला मुळीच ठाऊक नसेल, असेही संभवत नाहीं. तर मग हा शिका चालू करणारे लोक कोण ? शहाजीच्या गर्भित संमतिखेरीज शिवाजीच्या दर- बारांत असला नवीन शिक्षा कसा सुरू होऊं शकेल ?"

 इ. सन १६३८च्या अखेरीस शिवाजी बेंगरूळहून पुण्यास आला. येतांच त्यानें " बारा मावळें" काबीज केली असें सभासदाच्या बखरीत लिहिले आहे. पण तेव्हां तर शिवाजी आठ वर्षांचा होता. आठ वर्षांच्या मुलानें हीं मावळें काबीज करावयाची कशी ? अर्थात् त्याच्या नावावर हणमंते


 शिवाजी नऊ वर्षांचा होता, त्या वेळी, म्हणजे इ. सन १६३९ मधील आक्टोबरांतील एका कागदावर खालीलप्रमाणे शिवाजीची राजमुद्रा ( राज- वाडे खंड १५–४३७ पहा ) दिलेली आहे ती:-

॥ प्रतिपश्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
|| शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ॥

 अर्थ:-आज ही मुद्रा प्रतिपदेच्या चंद्ररेखेप्रमाणे अल्प असली तरी तो उत्तरोत्तर वृद्धी पावून सर्व लोकांना वंद्य होणार आहे; आणि ती शहाजी- पासून शिवाजीला प्राप्त झाली असून केवळ लोककल्याणाकरितांच ती त्याने धारण केली असल्यामुळे ती शोभत आहे.
१०