पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४८ )

केला होता असे जरी मानले, तरी त्या दोघांवर संभाजीची नाराजी होण्यास कांहींच कारण नव्हतें. संजाजीची व जिजाऊची विजापुरास शेवटची भेट झाली, त्यानंतर तो तेरा वर्षे जिवंत होता. त्या मुदतीत जिजाऊने आपल्या थोरल्या मुलास भेटण्याकरितां एकदांसुद्धां कर्नाटककडे जाऊं नये, अगर आईला भेटण्याकरितां त्याने एकदांबुद्धां पुण्यास येऊं नये, हे कसे घडलें ? पुण्याच्या मंडळींनी कर्नाटककडे बधूं नये आणि कर्नाटकच्यांनी पुण्यास आपली कोणी माणसें आहेत, हें मुळीं भजीबात विसरून जावें, हा सारा शहाजीनें कांहीं मतलबामुळे मुद्दाम घडवून आणिलेला प्रकार दिसतो. शिवाजी- कडून पुंडावा करावायचा, आणि आपण नामानिराळें रहायचे, याखेरीज यांत दुसरा मतलब दिसत नाहीं" सारांश शिवाजीनें स्वतंत्र राहून राज्यसंस्थापना केली, तरी शहाजीस ती पाहिजेच होती, व शहाजीचा स्वतः निदान मांडलिकी राज्य तरी स्थापन करण्याचा इरादा होता, असें, शहाजीच्या वर्तनावरून निदर्शनास येतें.

 मुधोळकर बाजी घोरपडे यानें महंमद अदिलशहाच्या हुकुमानें शहाजीस पकडलें होते; त्यामुळे संधी साधून शहाजी हा बाजी घोरपडयाचा सूड उग- वील अशी शहाची खात्री होती. त्यामुळे शहाजीच्या सूडापासून बाजी घोर- पडयाचे संरक्षण करण्याला तो अत्यंत दक्ष होता. म्हणून शहाजीस कर्ना- टकांत परत जाण्याची रजा देण्यापूर्वी त्यानें “ भी बाजी घोरपडयास अथवा त्याच्या जहागिरीस कधींही तिळमात्रसुद्धां उपद्रव देणार नाहीं;" अशी- त्याच्याकडून शपथ घेवविली; आणि उभयतांमध्ये सख्य झाले हें दर्शविण्या करितां उभयतांनी आपापल्या इनाम जमिनीची अदलाबदल करावी, असे ठरवून त्याप्रमाणे व्यवस्था केली. शहाजीनें स्वतः या शपथेचे शब्दश: पालन कले. त्यानें स्वतः बाजी घोरपडयास अथवा त्याच्या जहागिरीस तिळमात्रही उपद्रव दिला नाहीं; पण त्याच्या विषयींचा शहाजीच्या मनांतील दंश लवमात्रही कमी झाला नाही. म्हणून कर्नाटकमध्ये येऊन पोहोचताच शहाजीनें शिवाजीस असे पत्र पाठविलें कीं, तुम्ही जर माझे खरे पुत्र असाल तर, बाजी घोरपडयाचा सूड घेतल्याशिवाय तुम्हीं कर्धीही राहणार नाहीं." शहाजीनें असें पत्र मुद्दाम लिहून जरी शिवाजीस