पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५० )

हजार निवडक सैन्य घेऊन ताबडतोब विशाळगड* येथून निघाला व मोठ्या झपाट्याचे कूच करीत मुधोळ+ येथे आला; आपल्या वडिलांना दग्यानें पकड- णाऱ्या बाजी घोरपडघास त्यानें मुधोळ येथें अचानक गांठले. शहाजीच्या त्या शत्रूचा पूर्णपणे सूड घेण्याची संधी शिवाजीस ह्या वेळी मिळाली. त्यानें बाजी घोरपडथावर त्याच्या मनीमानसी नसतां, आणि म्हणूनच तो बेसावध असतां अचानक मोठ्या जोरानें छापा घातला; त्याच्यावर मोठ्या निकरानें तुटून पडला. या वेळीं बाजी घोरपडे बेसावध होता, तरी तो मोठा शूर व कर्तृत्ववान सरदार असल्यानें तो शिवाजीशी मोठ्या शौर्यानें व हिमतानें लढत राहिला; आणि अखेरीस तो स्वतः, त्याचे मुलगे, इतर नातलग, व त्याचें सैन्य रणक्षेत्रांत ठार झाले. या वेळी शिवाजीनें घोरपडे मंडळींना ठार मारिलें. बाजी घोरपड्यावर पूर्णपणे सूड उगवून घेतला; त्याच्या सर्व प्रदेशाची धूळ- धाण उडविली; त्याचा सर्व प्रदेश लुटून मुबलक संपत्ति मिळविली; मुधो- ळचा प्रांत आपल्या ताब्यांत घेतला; आणि शहाजीस ही सर्व हकीकत पत्रानें कळविली. X ती ऐकून शहाजीस अतीशय आनंद झाला; त्याला अती- शय धन्यता वाटली; आणि अशा रीतीनें वडीलांची इच्छा पूर्ण करून शिवाजी पितृऋणांतून मुक्त झाला.

 * विशाळगड हे संस्थान कोल्हापूरकर छत्रपतींचे मांडलीक असून तेथील संस्थानिकास “पंत- प्रतिनिधी" असा किताब आहे. विशाळगड ही या राज्याची पूर्वीची राजधानी असून, मलकापूर ही हल्लींची राजघानी आहे. विशाळगड हे ठिकाण मलकापूरपासून अजमार्से ३६ मैलांवर असून मलकापूर हे कोल्हा- पुरापासून पश्चिमेस २४ मैलांवर शाळी नदीच्या कांठी आहे.

 + मुधोळ हे शहर दक्षिण महाराष्ट्रांत, विजापूर जिल्ह्यांतील बागलकोट या तालुक्याच्या ठिकाणापासून ३३ मैलांवर व सदर्नमराठा रेलवेच्या मिरजे- पलकडील कुडची स्टैशनपासून ३६ मैल जमखिंडी व तेथून पूढे सडकेनें दक्षिणेस बारा मैलांवर मलप्रभा नदीच्या कांठी आहे.

 x या मोहिमेच्या बाबतीत शहाजीच्या पत्राचें शिवाजीनें जें उत्तर पाठविलें, त्यांत बाजी घोरपढ्याच्या बाबतींत त्यानें शहाजीस जो मजकूर