पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५१ )

शहाजीनें अदिलशहास कबूल केल्याप्रमाणे कर्नाटकांत गेल्याबरोबर चित्र- कलकर भरमा याच्यावर स्वारी केली; व आपल्या सैन्यसरंजामासह तो अचा- नक चित्रकल येथे येऊन धडकला; त्या वेळी भरमा माशाची शिकार करीत होता. त्यास शहाजी आपणावर चाल करून आला असे कळतांच मोठ्या तांतडीनें तो घोडेस्वार झाला; आपल्या सैन्याची जमवाजमव केली; आणि शहाजीवर चाल करून गेला. उभयतांमध्ये मोठेच जोराचें युद्ध झालें; व त्यांत भरमा शहाजीच्या हांतून ठार झाला; ( इ० सन १६४८). तेव्हां भरम्याची सर्व बिरुदे व बाढबिछायत शहाजीनें जप्त केली. तीं घेऊन तो अदिलशहाकडे विजापूर येथें आला, व भरम्याच्या त्रासांतून शहाजीनें आपणास मुक्त केलें याबद्दल शाहास समाधान वाटून त्याने ती शहाजीस परत बक्षीस दिली. तेव्हांपासून तंजावरकर भोसल्यांचे राजघराणे ही बिरुदें वापरूं लागले.

 शहाजी विजापूर येथें आल्यावर अदिलशहानें त्यास मोठ्या इतमामानें आपणाजवळ अजमासे चार वर्षे ठेवून घेतले; ( इ० सन १६४९ ते इ० १६५२ पर्यंत. ). शहाजीस आपणाजवळ ठेवून घेण्यांत आपण त्याचा मोठाच सन्मान करीत आहों, असें आदिलशाहानें वरकरणी दाखविलें, परंतु असे करण्यांत त्याचे बरेच अंतस्थ हेतू होते. शहाजी कर्नाटक मध्ये स्वतंत्र राज्य- स्थापना करील, अशी त्यास भीती होती. शहाजीला आपण विजापूर येथे राहवून घेतल्यास त्याला आपण ओलीस ठेविले, असे समजून शिवाजी


लिहून कळविला तो अखा:- "आपले पत्र मिळाल्यावर आम्ही आपल्या सैन्यासह मुधोळ येथे गेलों. त्या प्रदेशाची धूळधाण उडविली; व तिकडील ठाण हस्तगत करून घेतलीं. बाजी घोरपडे यांस ही हकीकत कळल्यावर त्यानें आमच्याबरोबर युद्ध केले; परंतु त्यांत तो व त्याचे सरदार मारले गेले. मोठा घनघोर युद्धसंग्राम झाला. नंतर आम्ही मुधोळच्या सर्व प्रदेशभर स्वारी करून तो सर्व प्रदेश मनसोक लुटला. त्या वेळी आम्हांस अतीशयच लूट मिळाली. नंतर आम्ही त्या प्रदेशांतील लोकांनी शांत राहावें, असे जाहीर करून तो प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला. "