पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५२ )

आपणाविरुद्ध बंडाळी माजविणार नाहीं, अशी त्याची खात्री होती; व खुद्द विजापूर येथेच शहाजीचे वास्तव्य राहिल्यानें शिवाजी व शहाजी यांच्यामध्यें पत्रव्यवहार घडत असल्यास ते सहज उमगून येणे सुलभ होईल, अशी त्यानें योग्य अटकळ बांधली होती, व म्हणूनच त्यानें वरपांगी शहाजीचा गौरव करीत राहून त्यांस आपणाजवळच विजापूर येथें ठेवून घेतले होते; आणि त्यामुळेच, तात्पुरती का होईना, पण आदिलशाहाची धोक्याची राजकीय परिस्थिती थोडी फार सावरली गेली होती. शहाजीस जवळ ठेवून घेतल्यामुळे, तो कर्नाटकमध्ये स्वतंत्र राज्यस्थापना करील, ही शाहाची भीती नष्ट झाली. या चार वर्षांच्या अवर्धीत शिवाजीनें आदिलशाही प्रदेशास उपद्रव दिला नाही, त्यामुळे शहाची एक मोठीच काळजी नाहीशी झाली, आणि या चार वर्षांच्या अवर्धीत "शहाजी व शिवाजी यांचा पत्रोपह तिळमात्रही संबंध नसून शिवाजी शहाजीच्या सल्याने बिलकुल वागत नाहीं " अशी शहाची पक्की खात्री होऊन शहाजीबद्दलचा त्याचा संशय दूर झाला. तथापि शहाजी पुष्कळ दिवस कर्नाटकच्या बाहेर राहिल्यामुळे तिकडील राजकीय वातावरणांत पुन्हां मोठ्या जोराची खळबळ सुरू झाली. शहाजीच्या लोखंडी हातांखाली दवून राहिलेल्या कर्नाटकमधील पाळेगारांनी पुन्ही सारखो बंडाळी माजवून सर्व कर्नाटकभर धुमाकूळ उडवून दिला; बेदनूरकर शिवाप्पा नाईक, पेनगोर्डेकर राजा रायल, अलमगडकर नायक वगैरे पाळेगार मंडळींनी कर्नाटक मधील मिळेल तितका प्रदेश आंगाखाली घालण्याचा उद्योग आरंभिला, आणि कुत्बशाहाचा प्रसिद्ध वजीर मीरजुम्ला यानें गंडी- कोटचा दुर्भेद्य किल्ला हस्तगत करून घेऊन अर्काट पर्यंत कुत्बशाही हद्द वाढ- विली. मीरजुम्ला हा मोठा शूर असून पांच हजार घोडेस्वार व स हजार पायदळ त्याच्या संग्रहीं होतें. तो अतीशय संपत्तिमान होता. आपल्या जोरदार सैन्याच्या साह्याने तीनरों मैल लांब व पन्नास मैल रुंद इतका पूर्व कर्नाटकचा विस्तीर्ण प्रदेश इस्तगत करून घेऊन, कुत्बशहास धाब्यावर बसवून तो बहुतेक स्वतंत्र राज्यकर्ता बनला होता; व त्याच्या राज्याची हद्द शहाजीच्या ताब्यांतील बंगळूरच्या प्रदेशाला भिडून ती सरकत सरकत आदिलशाही प्रदेशांतही घुसली होती; आणि शहाजीच्या ताब्यांतील बंगळूर