पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५३ )

प्रांताचा कांहीं भागही त्यानें बळकाविला होता. अर्थात या बलाढ्य शत्रूशीं झुंजण्यास तसाच बलिष्ट व खंदा वीर कर्नाटकप्रांती पाठविणे आदिलशहास भागच होतें; व तसा वीर पुरुष एकटा शहाजी हाच असल्यामुळे त्यासच तिकडे पाठविणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने शहाजीस कर्नाटकप्रांती जाऊन मीरजुम्ला व इतर पाळेगार यांचा बंदोबस्त करण्याचा हुकुम दिला, व त्याप्रमाणे इ० सन १६५३ मध्ये शहाजी पुन्हां कर्नाटकमध्ये येऊन दाखल झाला.

 या वेळी आदिलशाहा व शजाजी या उभयतांच्या मनांत दोन निरनिराळे विशिष्ट उद्देश साधावयाचे होते; आणि म्हणूनच आदिलशाहानें शद्दाजीस कर्नाटकमध्ये परत पाठविले होते, व शहाजीनेंही आदिलशहाचा हा हुकूम तात्काल मान्य करुन कर्नाटकप्रांत प्रयाण केलें होतें. मीरजुम्ला बशहाजी हे उभयतांही अत्यंत बलिष्ट होते; त्यामुळे ह्या उभयतां बलिष्ठांच्या चिका- टीच्या सामन्यांत मिरजुम्ला नामोहरम झाला, तर बाहेरचा एक प्रबळ शत्रू कमी झाला, आणि शाहाजी नामशेष झाला तर आपल्या अस्तनींतील निखारा कायमचा विझला, म्हणजे या दोन्ही पैकी कोणताही परिणाम घडून आला तरी आपला फायदाच होईल, ह्या विशिष्ट उद्देशानें शहाजीवर ही कामगिरी लादली; आणि आपली जहागीर सुरक्षित राहावी, व आपण कर्नाटक मध्ये पुन्हा परत जाऊन, आपली सत्ता पूर्वीप्रमाणे स्थिर करून च वाढवून जमल्यास आपण स्वतंत्र व्हावे, अशी शहाजीची उत्कट इच्छा असल्यामुळे शहानें त्यास कर्नाटकप्रांत परत जाण्याचा हुकूम दिल्याबरो- बर त्यानें तिकडे प्रयाण केले होतें; आणि सर्वांत प्रबळ जो मीरजुम्ला त्याचा समाचार शहाजीनें प्रथम घेतला. या बाबतींत जयराम कवी लिहितो की, ( रा. मा. वि. चंपू पहा; ) " शहाजीनें मीरजुम्ला याची इतकी दुर्दशा उडवून दिली की, थकून व रंजीस येऊन तो शहाजीशीं घड लढेहिना; घड आडकाठीहि करीना; किंवा धड खडा राहून भिडेहिना एक पळण्याचा तेवढा धडा मौरजुम्ला जेरीस येऊन गिरवीत बसला. शेवटी दे माय घरणी ठाय अशी त्याची स्थिती होऊन, तो शहाजीचे रहे खात खात गुत्तीच्या किल्लयांत शिरला; तेव्हां शहाजीनें वेढा देऊन चोहों-