पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५५)

ताब्यांत आणिलें तथापि इतक्यांतच कनकगिरीकर सरदार अप्पाखान यानें बंड केलें; तेव्हां तें मोडून टाकून कनकगिरी हस्तगत करून घेण्याकरितां शहाजीने आपला वडील मुलगा संभाजी यांस तिकडे पाठविलें. या वेळी विजापूरचा प्रसिद्ध व शूर सरदार अफझलखान हा कर्नाटक प्रांतांमध्ये असून त्यानें तिकडे अनेक युद्धप्रसंग करून किर्ती मिळविली होती. संभाजीनें कनक- गिरी हस्तगत करून घेण्याकरितां त्या किल्ल्यावर हल्ला चढविला; त्या वेळी अफ्झलखानानें दगा केल्यामुळे संभाजी मारला गेला ! शहाजीस दी हकी- कत कळल्यावर त्याच्या मनाला भयंकर धक्का बसला ! पुत्रशोक झाला ! आपल्या लाडक्या मुलाचें निधनवृत्त ऐकून त्याचें हृदय दुःखामीनें होरपळून गेलें । तथापि त्यामुळे हताश होऊन रडत बसणारा तो अभिमानशून्य मनुष्य नव्हता; कच्चा दिलाचा नव्हता; फडफडत्या मनाचा नव्हता; इभ्रतीचा पुरुष होता. राष्ट्रजन्म देणाऱ्या विभूतीला जन्म देणारा तो नरशार्दूल होता; पुत्रशोकाचें दुःख गिळून जाऊन त्याने लागलीच घडाक्यानें कनकगिरीवर इल्ला केला; आपल्या दुष्मनाला नेस्तनाबूद केलें; कनकगिरी हस्तगत करून घेतली, आणि संभाजीच्या मृत्यूचा सूड उगवून तो तंजावर येथे परत आला.

 संभाजी हा शहाजीचा अतीशय लाडका मुलगा होता. लहानपणापासून आपल्या वडिलासन्निध राहून क्षात्रधर्माचे धडे घेत घेत तो पढाईत सेना- नायक झालेला होता, व लहानपणापासूनच त्याची कर्तबगारी दिसून आली होती. असा हा कर्ता मुलगा नाहींसा झाला, या बद्दल शहाजीस तर अती- शय दुःख झालेच असेल; पण माता जिजाबाई हिच्या मनाची, ही दुःखद वार्ता ऐकून काय स्थिती झाली असेल ! बाळपण लग्न होईपर्यंत तिला काय थोडें फार सौख्य लाभले असेल तेवढेच ! पण त्या नंतर या माऊलीचा सर्व जन्म दुःखांत, कष्टांत व मानसिक विवंचनेत पार झाला ! स्त्रियांचे नातें स्थित्यंतरापासून निरनिराळें बनत जातें; व मुलगी, बायको, व आई हो त्यांची तीन स्थित्यंतरे होतात. जिजाबाई गृहिणीपदाला प्राप्त झाल्यापासूनच बाप आणि नवरा यांच्यामधील चुरशीच्या कलहाला प्रारंभ झाला व ती मातृपदाला पोहोचल्यानंतरही हा कलह जाधवरावाच्या मृत्यूपर्यंत- जाधव- रावास मूर्तुजा निजामशहा विश्वासघातानें ठार मारीपर्यंत सुरूच होता. त्या-
-