पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५६ )

नंतर शहाजीची कैद, व संभाजीचा मृत्यु, हे प्रसंग तिने पाहिले; पुढे शहाजीचा मृत्यु हाऊन वैधव्याचा खडतर प्रसंग तिच्या नशीबी आला ! शिवाजीच्या केविलवाण्या दुःखी मुद्रेकडे पाहून सहगमनाचा विचार रहित करून ती आयुष्याचे दिवस कंठू लागली, तोच तिची सुशील व सुस्वभावी स्नुषा, शिवाजीचें वडील कुटुंब, दुर्दैवी छत्रपति संभाजी महाराजांची माता सईबाई तो दोन वर्षांचा असतां, मृत्यु पावली, हें दुःख तिनें पाहिलें ! संभाजीचा पितृद्रोइ तिर्ने पाहिला; युवराज संभाजी छत्रपति शिवाजीचा शत्रू झाला, मोगलांस फितूर झाला, दुर्वृत्त झाला, समर्थ रामदासस्वामीच्या सन्निध ठेवूनही त्याचा कांहींदी उपयोग न होतां तो विषयी व व्यसनी निघाला, हा नशिबाचा योगायोग तिनें पाहिला ! महाराष्ट्र धर्म वाढविणारा, गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजीमहाराज, याचाच प्रत्यक्ष मुलगा, संभाजी, मोंगल सर- दार दिलीरखानास मिळून भूपाळगडावर चाल करून आला. पिता शिवाजी मराठाशाहीची प्राणप्रतिष्ठा करीत असतांनाच पुत्र संभाजी, त्याच मराठा- शाहीच्या नरडीस नख देण्याचा उद्योग करूं लागला, हें दुःख तिनें अनु- भविलें; गोब्राह्मण प्रतिपालन हॅ ज्यांचे ब्रीद त्या शिवरायाचा मुलगा संभाजी याने एका ब्राह्मणाच्या स्त्रीशी दुर्वृत्त करण्याचा प्रयत्न केला, तिजवर बला- त्कार केला, यामुळे त्या थोर विभूतीस झालेले दुःख दिला पाहावे लागले; आणि आपला दुसरा प्राण असलेल्या शिवबाचा राज्याभिषेक पाहून अजमार्से पंधरा दिवसांनी या अलौकिक स्त्रीच्या इहलोकीच्या जीवनयात्रेचा शेवट झाला.

 संभाजीचा मृत्यू झाला, त्याच वर्षी शहाजीचा प्रामाणिक, स्वामिनिष्ठ, व मुत्सद्दी कारभारी नारो त्रिमल हणमंते हा मंगळूर येथे मृत्यू पावला; इ० सन १६३८ पासून इ० सन १६५३ पर्यंत नारोपंत हा शहाजीच्या कर्ना- टक मधील जहागिरीचा कारभारी होता; व त्याने त्या जहागिरीची उत्तम व्यवस्था ठेविली होता, त्याच्या मृत्यूमुळे शहाजीस दुःख झालें; त्यास रघु- नाथ व जनार्दन असे दोन मुलगे होते; x त्यापैकी रघुनाथपंत हा आपल्या


x नारोपंत हणमंते, हा दादोजी कोंडदेवाप्रमाणेच, मलिकंबरच्या हाता- खाली राज्यव्यवस्थेच्या बाबतीत शिक्षण घेतलेल्या ब्राम्हण मुत्सद्यांपैकी