पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५८ )

 इ० सन १६५३ पासून ह्मणजे शहाजी हा विजापूर येथून कर्नाटक प्रांतांत परत गेला त्यावेळेपासून, इ सन १६६२ पर्यंत अजमार्से दहा वर्षे तो आपला धाकटा मुलगा व्यंकोजी, व कुटुंबांतील इतर मंडळीसह आलटून 'पालटून तंजावर व बंगळूर येथे रहात असे; मध्यंतरी इ सन १६५६ मध्ये ( ता • ४ नोव्हेंबर ) महंमद आदिलशाह हा दुखण्यानें व काळजीनें खंगून मृत्यू पावला, व त्याचा अठरा वर्षांचा मुलगा अली हा गादीवर आला. त्याला खाऊन टाकण्याला चार नऋ टपून बसले होते. पहिला नक शिवाजी, दुसरा नक शहाजी, तिसरा नक्र औरंगझेब, व चौथा नक अमीर उमराव. ह्या चार नक्रांतून पहिली कुरापत औरंगझेबाने काढली. " ही औलाद महंमद- शहाची नव्दे" असा आरोप बिचान्या अल्लीवर अवरंगझेबाने आणिला. अल्लीशाहा औलाद असो, अफलाद असो, की नकल असो त्याच्यामुळे अवरंग- झेबाचे कोणतें गोत्र बिघडत होतें तें देव जाणे! हा आरोप अल्लांच्या कारभा- यांनी साइजीकच नाकबूल केला एवढे कारण लढाई पुकारण्याला औरंगझेबा- सारख्या बीलझिबलला बस झाले. दुसरें सैतान शिवाजी. त्या कज्जेदलालाला हे भांडण निघालेले पाहून केवळ हर्षवायू झाला. नवरा मरो, नवरी चुलीत जावो, दोह्रीं कडून भवदान मारण्यास सवकलेल्या त्या बुभुक्षितानें दोन्ही कडून आपला डाव साधण्याचा बेत केला. मल्लीशहालाही मदत करण्याचें


१७३५ मध्यें ( ता० २९ आक्टोबर ) श्रीमंत छत्रपति शाहू महाराजा- कडून बाणेरे गांवाबद्दल नवीन सनद करून घेतली.

 नारो मिल यांस एकंदर किती मुलगे होते, ते नक्की समजत नाही. तथापि इ० सन १६६२ मध्ये, शहाजी हा शिवाजीच्या भेटीस दक्षिणेत आला, त्यावेळी त्रिंबक नारायण हणमंते हा त्याचा या स्वारीतील कारभारी होता; त्यावरून रघुनाथपंत व जनार्दनपंत, हे दोन मुलगे तर होतेच पण तिसराही एक मुलगा असावा असे दिसते. या हणमंते घराण्यापैकी बाळकृष्ण- पंत हणमंते यांस शिवाजीने पुढे फडणिशी कामावर नेमिलें होतें; या घरा- ण्याची हकीकत पुढे प्रसंगानुसार दिलेली असल्यामुळे त्या बाबतीत या ठिकाणी अधीक खुलासा केला नाहीं.