पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या देवराजजीच्या वंशांत अनुक्रमें इंद्रसैन, शुभकृष्णजी, रूपसिंहजी, भूम- द्रजी, धापजी, बरहटजी ऊर्फ बरबटजी, खलकर्ण ऊर्फ खलाजी, कर्णासंहजी ऊर्फ जयकर्ण, संभाजी, व शिवाजी ऊर्फ खेळोजी ऊर्फ बाबाजी हे पुरुष अनुक्रमें निर्माण झाले. यासंबंधी अष्ट प्रधानांच्या इतिहासांत, ( भोरकर भिडे कृत ) असे लिहिले आहे की, " भोसाजीच्या भाऊबंदांपैकी खलकर्ण व मलकर्ण या दोन बंधूंनी दक्षिणेत येऊन निजामशाहींत चाकरी घरिली. त्यांस प्रत्येकी दीड हजार स्वारांची मनसब मिळाली, व त्याजबद्दल चाकण- चौ-यांशी, पुरंदर परगणा व सुपें महाल दें त्यांना तैनातीदाखल मिळाले. मालोजी मृत्यु पावला, त्यावेळी त्यास बाबाजी या नांवाचा एक मुलगा होता, परंतु तो अज्ञान असल्यामुळे सरंजामाची अव्यवस्था होऊं नये, म्हणून तो सरकारांत जमेस ठेवण्यांत आला होता. त्यामुळे बाबाजीस घेऊन त्याची मातोश्री दौलताबादेहून वेरूळई घुमेश्वर+ येथे येऊन राहिली. बाबाजी मोठा झाल्यावर त्याने भीमानदीच्या कांठीं कांहीं गांवच्या पाटिलक्या खरेदी घेतल्या...... दक्षिणत दिवसेंदिवस यवनांचे प्राबल्य, याजमुळे श्री सिंघणापूर + महादेव हाच एक लिंग कुलस्वामी, व श्री तुळजापूर भवानी हांच चितोड देवी, असे जाणून परमभक्ति करून, तो वंश परम धर्मशील, शूर, प्रतापी, असा


 *दौलताबाद हें ठिकाण निजामच्या राज्यांत औरंगाबाद जिल्ह्यांत, औरंगाबाद व हैद्राबादच्या वायव्येस अनुक्रमें दहा व अठ्ठावीस मैलांवर आहे.

§ वेरूळ हे निजाम रेल्वेच्या मनमाडवरून जाणान्या फांठ्यावरील एक स्टेशन असून ते ओरंगाबादेपासून तेरा व दौलताबादेपासून सात मैलांवर आहे.

+घृष्णेश्वर (?)
 सिंघणापूर हे ठिकाण सातारा जिल्ह्यांतील माण तालुक्यांत, फलटण संस्थानच्या सरहद्दीलगत आहे.

 तुळजापूर हें गांव, व तालुक्याचे ठिकाण निजामच्या राज्यांत, नळदुर्ग जिल्ह्यांत, सोलापूर जिल्ह्यांतील माढा या तालुक्याच्या - जी. आय. पी. रेल्वेच्या पुणे- रायचूर मार्गावरील— स्टेशनपासून तीस मैलांवर आहे.