पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६१ )

याच महत्वाच्या काळांत इकडे शिवाजीनें चंद्रराव मोरे व अफझलखान या उभयतांचा नाश करून व शिद्दीजोहार, वाडीकर सावंत व बाजी घोरपडे वगैरे सरदारांशी दोन हात करून, आदिलशाही राज्यावर पाहिजे तसा हात मारण्याचा सपाटा चालविला होता. त्यामुळे अल्ली आदिलशाह अतीशय भिऊन


शौकत इतिहाद एकबाल व इजलाल हमराह अलिशान रफी अलकदर खुल- दमकान उमदेह वजरायेजमा कूद व उमराय नसरत निशान

 अजी बदिल माहिद माहाराज शाहाजी राजे सलाम बाजद सलाम महबत आजम महवत मुख्य आंकी; प|| कनकगीर पेशअजी दरगाह ( बादशाही सेवेस. )

 बंदगीस पेश ( अर्पण केला ) केली त्याचा मुबादला आपल्यास मन्हमत जाला. यावरी प|| अनागोंदीहि पेश केली (पाचा ) महिना जाला. इनोज (तथापि ) मुबादलियाचा सरंजाम जाला नाहीं. जमेयतीचाही दिलासा जाला पाहिजे. कुंदगोलकार मनेवारे ( बंडखोर ) आपले जागी व तामगौड तर्फेस तसवीस देउनु ( देऊन ) फिसाद केली आहे. त्यास गोशमाल (शिक्षा) द्यावयाबद्दल हजरत जान्हपन्हा साहेबो आपल्यास रजा ( आज्ञा ) दिल्ही. ते तर्फेस मैसूरकराचीही सरहद्द नजदीक आहे. वगैरे संगीनत मुराई दफे होऊनु (बंडखोरांचा हकालपट्टी होऊन ) पातशाही नामोश ( किर्ती ) राहत नाहों. आजी वास्ते हजार दीड हजार जाज ती कामाचे लोक ठेविले आहे. ती. वगैरे जागीर लोकांची समजावीस होत नाहीं. तरी दर बंदगीस अर्ज करुनु अने गोंदीच्या मुबादलियाचा सरंजाम केला पाहिजे. यास ऐवज ए " तर्फेस कर्यात अकोलोज व तपे टेभुरणी व भतग्राम अगर पेडणें हे कदीम मुलकांत देणे. सदरहु देणे नसेल तरी व मामले बादशाहबा देखाले जागा नसेल तरी प|| वडेरु या मामले मजकुराखाले चंजाऊरकरास दिधले आहे ते तन्ही मुबादलियास दिधले पाहिजे, आपण हरामखोर मनेवार चंजाऊरकरास गोशमाल देउनु सोडउनु घेऊनु. ( आपण चंदावरकरास शिक्षा देऊन सोड- वून घेऊं ) हरामखोर मनेवरास दिधल्यांत काय फायदा १ कुल मनेवाराचे
११