पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६२ )

गेला. शिवाजी आटपत नाही, असे पाहून त्याच्याशीं सामोपचारानें सख्य करावें असा त्याने विचार केला; व शिवाजी वळला तर शहाजीमार्फतच वळेल असे जाणून अदिलशहानें शहाजीस विजापूर येथे बोलावून घेऊन त्यास शिवाजीची समजूत घालण्याची कामगिरी सोपविली. इ० सन १६३७


मालोजी बिन
शहाजी

हेजीब मीरजुमला बराबरी गेले आहे ती.
व पा. मुसलकल आपली जागीर पेशजी
भिस्त रोजी रुस्तुमजमा बराबरी माहो-
लीहून हुजूर आलों ते वख्त चौलाखाची
जागीर दिधली. त्या मध्ये मुसलकलचा
फर्मान आपले नांवें दिधला. यावरी दुसरे
वख्ती मरहुमी खाने अजम असदखानाचे


गुजारतीनें लक्ष्मेश्वराचे वख्ती मोकरर आली तेही वख्तीं, व तिसरियानेही मरहुमी ख॥ अहमदखान याचे वख्ती मोकरर फर्मान दिघले तेही वख्ती मुसलक- लचा फर्मान आपलेच नांवें आहे. ऐसे तीन वख्त आपले नौवें फर्मान पर मचे आपले नांवें आहेती. या फर्मानाच्या नकला पातशाही दफतरी असतील त्या काहाडून पाहिल्या पाहिजेत. आपले भाई व फर्जद यांचे दिलासिया बा क ++++विले व फर्मान त्याचे नावें करुनु दिधले, तरी ते काय मसमुबाली हरकसीने गलथ. हुजूर मा + + करणारी करुनु मुसलकलचा मुबादला पंधरा खेडी कर्याती कारवे आपली जागीर त्रिंबकजीस द्यावया काय निसबत धरिते. हजरत साहेबाचा तरी कौल करारदाद आपल्यास आहे को तुमचे जागीरपैकी एक चावर कसीदगी करणे नाही. जरूर एक वख्त पातशाही कामा बा। कांहीं कसीदगी केले तरी अवल सवाईन मुबादला देउनु बाजद कासीद करावे. आमा ( परंतु ) अकार्तुकाचे बोले करनु आपले जागिरींत नाहक गैर हिसाबी पादशहा खलेल करविताती. तरी आपण रजपूत लोक अजतिलग पेशजही दोघा चौपादशाहीत खिदमत केली. आमा (परंतु ) गैर हिसाबी जाजती स्रोसुनु कम इजतीन व गैर मेहेरबानीन पेशजीही खिदमत