पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६३ )

त पुणे प्रांताला रामराम ठोकून कर्नाटकांत आल्याला शहाजीला ह्या वेळी, ( ६० सन १६६१८ध्यें ) चोवीस वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे आपण दक्षिणेत जावें, असा त्याचा फार दिवसापासून हेतू होता. शिवाजीनें ह्या वेळेपर्यंत अनेक पराक्रम गाजविले असल्यामुळे शहाजीस अतीशय आनंद


केली नाही व पुढेही न करू. उमेदीने आपण आजी दीड वर्ष जाजती सोसिली ते याच दमा (वर) को थोरले हजरतसाहेबाचे नवाजीस ( मेहेर बानीतले) व हजरत साहेबांही जहांबक्षी केली आहे व वख्तही एक जवाचा सम- जोनु आपण सबूरी करुनु तहमुल ( सहन ) करावयास तकसीर ( कमी ) केले नाहीं. पेस्तर हजरत साहेबास आपली दरकार असेल तरी हिसाबी आपला सरंजाम सदरहू केला पाहिजे. आणि दरकार नसेल तरी खुसनुदीन ( संतोषानें ) रजा दिधली पाहिजे. आपल्यास असलाद पुन्याई मामल्याचीही हवस ( हौस) कांहीं राहिली नाहीं. एखादे आपले हिंदुचे तीर्थी बसोन इकतालाची बंदगी करुनु ( परमेश्वराची सेवा करून ) हजरत साहेबास द्वा ( दुवा ) देउनु फर्जद भाई आहेती यांपासुनु खिदमत घेतली पाहिजे. अगर त्याहीपासुनु खिदमत घेणें नसेल तरी त्यासही रजा द्यावी. बाजे भाईबंद जेथे आपली पोटें भरिताती तेथें हेही भरितील. अमा नाहक आप ल्यास बदनाम केले न पाहिजे. दरी बाब हजरत बंदगौस हाली अर्जदास्त पाठविली आहे. तरी बडेभाईनें हि हजरत बंदगीस अर्ज करुनु सदरहुप्रमाणे अनागोंदीच्या मुबादलियाचा सरंजाम व पंधरा खेडियाचा फर्मान आपल्याच नावें देविला पाहिजे अगर आपल्यास खुषनुदीन रजा दिघली पाहिजे. व पर कनकगीर अनागोंदीही दरगाह बंदगीस पेश केली. एक कपली खेडे दिढादो हजाराचे आपण तेथें राहिलों होतों. तेव्हडे आपल्यास असो दिघले पाहिजे. तेथे बाग आपण केले. हवासीर जागा आहे. तरी दरगाह बंदगीस अर्ज करुनु मोकार कर नु देणे म्हणौनु मसुरल दौलत सांवतराऊ यांस लिहिले होते. सांवतराउ मा इलेने अर्ज केला. अमा इजरत साहेबी हुकूम फर्माविला को अनेगोदीच्या मेहतानास कपली पाहिजे. सोडून देणे. म्हणौनु राऊ मा। इलेने लिहिले. यावरी आपल्यास राहावयास जागादि नव्हती. व