पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७३)

"मालनदचा राजा ” ( मालनद हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ "डोंग- राळ प्रदेश " असा आहे. ) असेही म्हणत असत; सतत पंचेचाळीस वर्षे ( इ० सन १६१८ ते इ० सन १६६३ ) बेदनूरचा प्रदेश त्याच्या ताब्यांत होता. तो मोठा संपत्तिमान असून या वेळी ( इ० सन १६६२ ) तर तो विशेषच प्रबळ झालेला होता. सर्व दक्षिण कानडा, म्हैसूरचा वायव्येकडील प्रदेश, व गंगावती नदीपर्यंतचा उत्तर कानडा, एवढा व्यापक प्रदेश त्याच्या ताब्यांत होता, आणि विजापूरकरांच्या ताब्यांतील शक्य तेवढा प्रदेश बळक- विण्याच्या उद्योगास तो लागला होता. त्यामुळे अशा ह्या प्रबळ शत्रूचा पहिल्यानें बंदोबस्त करणे शहाजीस आवश्यक होते. म्हणून त्याने कर्नाटक प्रांती आल्याबरोबर भद्राप्पा नाईकावर स्वारी करण्याची सिद्धता केली. अदि- लशादानें त्याच्या मदतीस पाठविलेला सरदार सर्जेखान यांस बरोबर घेऊन तो बेदनूरकरावर चाल करून गेला. तेव्हा तिकडून भद्राप्पा नाईकही आपल्या कसलेल्या सैन्यासह शहाजीशीं युद्ध करण्याकरितां पुढे सरसावला; व उभ- यतांमध्ये मोठ्या चिकाटीचे अनेक युद्धसंग्राम झाले. इतक्यांतच मध्यंतरी इ० सन १६६३मध्ये, ( ता० १ मार्च ) अदिलशाहा दुसरा हा स्वतः कर्ना- टकच्या मोहिमेवर जाण्याकरितां आपल्या सर्व दरबारी मंडळीसह विजापूर येथून - धारवाडपासून अजमार्से शेहेचाळीस मैलांवर असलेल्या बंकापूर या ठाण्याकडे गेला. हे ठिकाण त्या वेळी अब्दुर्रहीम बहलोलखान या नांवाच्या सरदाराच्या जहागिरीत असून तो सरदार त्या वेळी कर्नाटकमधील नाईक पाळेगार लोकांवरील युद्धांत गुंतलेला होता. त्याची आई त्या वळीं बंकापूर येथे ठाण्यांतच होती. तिनें अदिलशहास पहिल्यानें ठाण्यांत येण्यास मनाई केली; परंतु मागाहून त्यास ठाण्यांत येऊं देण्याकरितां वैशांचे दरवाजे उष- डले. त्यामुळे शहानें रागावून बहलोलखान, शहाजी व इतर सरदार मंड- ळींना कर्नाटकमध्यें पत्र पाठवून " आपणास ताबडतोब येऊन भेटा " असा हुकूम फर्माविला; त्याप्रमाणें ती सर्व सरदार मंडळी सारखा जलदीनें प्रवास करीत-तुंगभद्रा नदीस मिळणा-या - वर्धा नदीच्या कांठी अदिलशहाची छावणी असतांना त्यास येऊन भेटली. त्या वेळी शहा अतीशय रागांत असल्याने त्यानें बहलोल व शहाजी या उभयतांनांही ताबडतोब पकडून त्यांना वेड्या