पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७४)

घालून प्रतिबंधांत ठेविलें; ( इ. सन १६६३. जून महिन्याच्या अखेरीस) • परंतु दोनच दिवसांनी त्याने शहाजांची प्रतिबंधांतून मुक्तता केली; तथापि कित्येक दिवस पर्यंत त्याचा सर्व अधिकार काढून घेतला व नंतर त्यानें त्यास पुन्हां पूर्वीप्रमाणे अधिकारापन केलें;+ म्हणजे शहाजीची कोणत्याही प्रकारें तिळमात्रही चूक नसतांनासुद्धां निव्वळ अदिलशहाच्या लद्दरीमुळेच त्यास दोन दिवस कारागृहवास भोगावा लागला, व अधिकारभ्रष्टही व्हावें लागलें. तथापि त्यानंतर लवकरच, अदिलशहाची शहाजीवर पुन्हां पूर्ण मेहेर- नजर झाली. शहाजीनें आपल्या पराक्रमानें व कर्तृत्वानें अदिलशहास पूर्ण- पर्णे संतुष्ट केलें. नंतर शहानेही त्याबद्दल त्याचा जाहीररीत्या योग्यप्रकारें गौरव केला व त्याची पुन्हां कर्नाटक प्रांती आपल्या जहागिरीवर परत रवानगी करून दिली.

शहाजी हा अली आदिलशाहानें तांतडीने बोलाविल्यावरून भद्राप्पा नाईक बेदनूरकर याच्या बरोबरील युद्ध तात्पुरतें बंद ठेवून, बंकापूर येथे


 † “ On ist March 1563, Ali Adilshah II, with all his court, left his capita lfor Bankapur. There they were at first denied entrance by the mother of Abdur Rahim Bahlol Khan, in whose fief it lay. But the gates were soon opened to the king. Adil Shah sum- moned Bahlol Khan, Shahji and other officers from the Karnatak, who come by forced marches and wai- ed on the king on the bank of the Wardha, ( on affluent of the Tungabhadra). Bahlol and Shahji were at once arrested and placed in chains ( end of June, 1663); but Shahji was released in two days, though he continued to be deprived of his command for some time. "

 Sarkar's Shivaji and His Times; Page 300.